Advertisement

मागच्या १० दिवसांत वरळीत एकही नवा कोरोना रूग्ण आढळला नाही

मागच्या १० दिवसांमध्ये मुंबईतील वरळी कोळीवाडा आणि त्याला लागूनच असलेल्या जिजामाता नगरमध्ये एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही.

मागच्या १० दिवसांत वरळीत एकही नवा कोरोना रूग्ण आढळला नाही
SHARES

मागच्या १० दिवसांमध्ये मुंबईतील वरळी कोळीवाडा आणि त्याला लागूनच असलेल्या जिजामाता नगरमध्ये एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. परिरातील रहिवाशांच्या दृष्टीने ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल.

मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात सध्याच्या घडीला प्रत्येकी केवळ एकच अॅक्टिव्ह रुग्ण आहे. हा भागा मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण प्रभागात येतो. एकेकाळी या परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते. कोरोनाबाधित (coronavirus) रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी वरळी कोळीवाड्यात एप्रिल २०२० मध्ये मुंबईतील पहिला कंटेन्मेंट झोन बनवण्यात आला होता.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ७ जून २०२१ पासून म्हणजेच मागील १० दिवसांपासून वरळी कोळीवाडा आणि जिजामाता नगरमध्ये एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. आतापर्यंत या दाटीवाटीच्या परिसरात १,०९९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ७० रुग्णांचा मृत्यू झाला असून १,०२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा- पुढच्या २ ते ४ आठवड्यात महाराष्ट्रात तिसरी लाट येणार?; टास्क फोर्सची महत्वाची माहिती

ज्या वेळी मुंबईत २०२० मध्ये पहिल्यांदाच कोरोनाबाधितांची (covid 19) संख्या वाढत होती. त्यावेळी वरळी कोळीवाडा आणि जिजामाता नगरमध्ये देखील एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा संसर्ग फैलावत होता. दर दिवसाला नवीन रुग्ण आढळून येत होते. ही स्थिती आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिकेच्या (bmc) अधिकाऱ्यांनी परिसरात कंटेन्मेंट झोन तयार केला. कठोर निर्बंध लादले. तब्बल २ महिन्यापर्यंत येथील रहिवाशांना परिसरातून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला. तर कित्येक दिवस रहिवासी आपापल्या घरातच होते. सर्वांना अत्यावश्यक वस्तू आणि सेवा प्रशासनाकडून पुरवण्यात येत हाेत्या. लोकांच्या सहकार्याने येथील कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आलं.

पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोना संसर्गाची दुसरी लाट अधिकच घातक मानली जात आहे. या लाटेने मुंबई, महाराष्ट्रासहीत देशातल्या अनेक राज्यांना तडाखा दिला. दुसरी लाट ओसरत असली, तरी या लाटेने आपल्याकडील दुबळ्या आरोग्य व्यवस्थेवर प्रकाशझोड टाकण्याचं काम केलं. तर तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर व्यवस्था उभारली जात आहे.

मुंबई महापालिकेकडून लसीकरणाची माेहीम हाती घेण्यात आलेली असली, तरी अपुऱ्या लससाठ्यामुळे अजूनही या मोहिमेला गती मिळू शकलेली नाही. मुंबईकर आपला नंबर येण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा