Advertisement

आरक्षणावर दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा- चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण या विषयांवर दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याची गरज आहे.

आरक्षणावर दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा- चंद्रकांत पाटील
SHARES

मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण या विषयांवर जर विशेष अधिवेशन घेतलं, तर आमदारांना त्यांचं मत आणि त्यांचे विचार मांडण्यास वेळ मिळेल. त्यामुळे मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण या विषयांवर दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याची गरज आहे, असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी व्यक्त केलं.

यासंदर्भात अधिक बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, एखाद्या अधिवेशनात जेव्हा तुम्ही अडीच तासांची चर्चा करता, तेव्हा सगळे अँगल येत नाहीत, कारण सगळ्यांना बोलायला मिळत नाही. म्हणूनच जर विशेष अधिवेशन बोलवलं, तर आमदारांना त्यात त्यांचे इनपुट्स देता येतील. खूप इनपुट्स आहे. जसं आर्थिक मागासांना रिझर्व्हेशन या विषयावरील काही अस्पष्टता आहेत. मागास आयोग का फेटाळला गेला? यावर अजूनही अस्पष्टता आहे. सवलती देण्याबाबतचे खूप नवनवीन प्रस्ताव आहेत.

हेही वाचा- सरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला ?- उद्धव ठाकरे

आज एकाने कल्पना मांडली की, १०० ते २०० कोटी रुपयांचं व्हेंचर कॅपिटल उभारता येईल का, अशा कॅपिटलमधून महाराष्ट्रातील अनेक तरूण खूप व्यवसाय करत आहेत, अशा खूप गोष्टी चर्चेमध्ये आहेत, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात मूक आंदोलनाचं नेतृत्व करणारे छत्रपती संभाजीराजे आणि इतर सहकारी तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्री यांच्यात गुरूवारी तब्बल ३ तास चर्चा झाली. या चर्चेत आजच्यासारखं एकत्र बसून खासदार संभाजीराजे यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढू. सारथीच्या योजनांना कुठंही पैसा कमी पडू दिला जाणार नाही. 

तसंच ज्या ज्या विभागात प्रश्न प्रलंबित आहे, त्यांच्याकडे तातडीने पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यात येतील हा विश्वास बाळगा. समाजातील निवडक जणांची एक समिती नेमून त्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती यांनी आज मांडलेले समाजाचे प्रमुख प्रश्न लगेच सोडविण्यासाठी समन्वयाने काम करू, असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींना आश्वस्त केलं.

(maharashtra bjp president chandrakant patil demands 2 day special assembly session on maratha and obc reservation)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा