मालाड भिंत दुर्घटना प्रकरण: कोणीही दोषी नाही

भिंतीमध्ये पावसाचे पाणी साचले आणि या पाण्याचा दबाव वाढून भिंत कोसळली, असे सांगण्यात आलं आहे.

SHARE

मुंबईत जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात मालाडच्या कुरारगाव येथील जलाशयाची सुरक्षाभिंत कोसळून ३० जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनप्रकरणी चौकशीचे आदेश पालिकाआयुक्तांनी दिले होते. मात्र या चौकशीत कोणीही दोषी नसल्याचा अहवाल आता पालिकेकडून सादर करण्यात आला आहे.

हेही वाताः- राष्ट्रवादीला गृहमंत्रिपद दिल्यास मातोश्रीवर कॅमेरे लागतील - चंद्रकांत पाटील

मालाडच्या राणीसती मार्गावरील ही इमारत २ जुलै रोजी सुरक्षाभिंत कोसळली होती. मुसळधार पावसात ही भिंत कोसळल्यामुळे मदतकार्यात ही अनेक अडथळे निर्माण होत होते. ही २० फूटी भिंत आजूबाजूला लागून असलेल्या झोपड्यांवर कोसळल्यामुळे ३० जणांचा मृत्यू झाला होता. तर ७५हून अधिक जण जखमी झाले होते. या भिंतीचे काम  २ वर्षांपूर्वी झाल्यामुळे या भिंतीच्या बांधकामावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार समितीने आपला अहवाल सादर केला आहे. मात्र, यातील सर्व अधिकारी आणि कंत्राटदार निर्दोष असल्याचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचाः- धक्कादायक! मुंबईत १० वर्षात वाढली तब्बल 'इतकी' वाहनं

या अहवालात भिंतीमध्ये पावसाचे पाणी साचले आणि या पाण्याचा दबाव वाढून भिंत कोसळली, असे सांगण्यात आलं आहे. तसेच पाणी वाहून नेण्यासाठी मोठी गटारं नसल्याने हे पाणी भिंतीत साचल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला आहे. २३५० मीटर लांबीची आरसीसीची भिंत ओमकार इंजिनीअर अॅण्ड क्रॉन्ट्रॅक्टर कंपनीने बांधली होती.

संबंधित विषय
ताज्या बातम्या