Advertisement

BMC Budget 2021: महापालिकेचं उत्पन्न घटलं, पण बजेट १६.७४ टक्क्यांनी वाढला

मुंबई महानगरपालिकेचा सन २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महापालिका सभागृहात सादर केला.

BMC Budget 2021: महापालिकेचं उत्पन्न घटलं, पण बजेट १६.७४ टक्क्यांनी वाढला
SHARES

मुंबई महानगरपालिकेचा सन २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प (BMC Budget 2021) महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महापालिका सभागृहात सादर केला. मुंबई महापालिकेनं यंदा ३९ हजार ३८.८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. गेल्या वर्षीचा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३३ हजार ४४१ कोटी रुपयांचा होता. यावेळी त्यात १६.७४ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यानुसार हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे. वर्षभरात कोरोनाशी मुकाबला करताना महापालिकेच्या महसूल उत्पन्नात ६३६.७३ कोटी रुपयांची घट झाली आहे. यामुळे मालमत्ता करात मुंबईकरांना कुठलीही सवलत देण्यात आलेली नाही.

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे २०२१-२०२२ या आर्थिक वर्षांसाठीचा अर्थसंकल्प सादर केला. मालमत्ता करातून मुंबई महापालिकेला ६७६८.५८ कोटी उत्पन्न मिळणं अपेक्षित होतं. परंतु सुधारित अर्थसंकल्पानुसार आता महापालिकेच्या तिजोरीत केवळ साडेचार हजार कोटी जमा होणार आहेत.  

सन २०२० - २०२१ या आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या उत्पन्नात २२६८.५८ कोटींची घट झाली आहे. विकास नियोजन खात्यातून ३८७९.५१ कोटी उत्पन्न अपेक्षित असताना आतापर्यंत केवळ ११९९.९९ कोटी उत्पन्न जमा झालं आहे. ‘एसआरए’कडून महापालिकेला जमीन अधिमूल्यापोटी ६१८ कोटी व पायाभूत सुविधा विकास आकारामुळे ९८२ कोटी येणं बाकी आहे. राज्य सरकारकडून महापालिकेला ५२७४ कोटी १६ लाख रु. थकबाकी येणं बाकी असून त्यात शिक्षण खात्याकडून ३,६२८ कोटी ८३ लाख रुपयांचा समावेश आहे.

हेही वाचा- महापालिकेच्या शाळा होणार आता ‘मुंबई पब्लिक स्कूल’

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे:

  • नायर रुग्णालयात १.५ टेस्ला एमआरआय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १७ ते २० कोटींची तरतूद
  • लिक्विड ऑक्सिजन टॅंक उपलब्धतेसाठी कोविड फंडातून ४०.३० कोटींची तरतूद
  • ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासण्या घरातच करण्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद
  • नर्सिंग प्राध्यापक संवर्गातील मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी  २० कोटींची तरतूद
  • संसर्गजन्य रोगांसाठी २०३० पर्यंत १०० टक्के बालकांचं लसीकरण करणार
  •  कस्तुरबा रुग्णालयाचं नूतनीकरण करण्यात येणार
  • आरोग्य विभागासाठी एकूण ४ हजार ७६० कोटींची तरतूद
  • एमआरआयडीसीएल मार्फत १६७५ कोटी इतका अंदाजित खर्च असलेली १२ पुलांची कामे हाती
  • देवनार पशुवधगृहाच्या आधुनिकीकरणासाठी ३० कोटी रुपयांचा निधी
  • कोस्टल रोडसाठी २ हजार कोटी, गोरेगाव मुलूंड जोड रस्त्यासाठी १३०० कोटी 
  • घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात कचऱ्यापासून  वीजनिर्मिती करता १ हजार ११९ कोटी
  • सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी १३३९. ९४ कोटी, मोठ्या जलवाहिन्यांची कामे २२९.५० कोटी,
  • मिठी नदी प्रकल्पची कामे ६७ कोटी
  • बेस्ट उपक्रमासाठी आगामी आर्थिक वर्षात ७५० कोटींची तरतूद
  • सफाई कामगारांसाठी निवासस्थान आश्रय योजना ५०० कोटी

(no property tax waiver in bmc budget 2021)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा