Advertisement

मुंबई महापालिका चतुर्थ श्रेणी कामगार भरतीची प्रतीक्षा यादी काढणार नाही!

मुंबई महापालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील १३८८ कामगार पदांसाठी महापालिकेने मागवलेल्या ऑनलाईन अर्जांमध्ये एकूण २ लाख ८७ हजार अर्जदार अंतिम ठरले. यासर्व उमेदवारांची लेखी परीक्षाही पार पडली. या परीक्षेचा निकाल प्रत्येक उमेदवाराच्या वैयक्तिक इमेल आयडीवर पाठवण्यात आला आहे.

मुंबई महापालिका चतुर्थ श्रेणी कामगार भरतीची प्रतीक्षा यादी काढणार नाही!
SHARES

मुंबई महापालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील १३८८ पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण या परीक्षेत अनेक उमेदवार उत्तीर्ण जरी झाले असले, तरी यामध्ये केवळ १३८८ उमेदवारांचीच निवड केली जाणार आहे. याचसोबत यंदा उत्तीर्ण उमेदवारांची प्रतीक्षा यादी बनवली जाणार नाही. त्यामुळे १३८८ उमेदवारांमधून जर कोणता उमेदवार तांत्रिकदृष्टया बाद झाला तर त्यापुढील उमेदवाराचा विचार केला जाईल, अशी माहिती सामान्य विभागाने दिली आहे.


आपले गुण स्वत:च तपासा

मुंबई महापालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील १३८८ कामगार पदांसाठी महापालिकेने मागवलेल्या ऑनलाईन अर्जांमध्ये एकूण २ लाख ८७ हजार अर्जदार अंतिम ठरले. या सर्व उमेदवारांची लेखी परीक्षाही पार पडली. या परीक्षेचा निकाल प्रत्येक उमेदवाराच्या वैयक्तिक इमेल आयडीवर पाठवण्यात आला आहे. उमेदवाराने सोडवलेली प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नांच्या उत्तराचे मॉड्युलर तयार करून पाठवले आहे. त्यामुळे या सर्व उमेदवारांनी उत्तरं तपासून आपले गुण स्वत:च तपासावे आणि त्यात कमी जास्त होत असतील तर आलेल्या इमेल आयडीवर लिहून पाठवावे, अशी सूचना महाऑनलाईन संस्थेने केली आहे.


५ मार्च अंतिम तारीख

सर्व उमेदवारांना गुणांच्या या हरकती आणि सूचनांसाठी ५ मार्च ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. त्यानंतर सर्वांचे गुण जाहीर करून १३८८ उमेदवारांची अंतिम यादी तयार केली जाणार आहे. परंतु या भरती परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा यादी बनवली जाणार नसल्याचं सामान्य विभागाने स्पष्ट केलं आहे.


तरच पुढील उमेदवारांचा विचार होईल...

यापूर्वी झालेल्या कामगारांच्या भरतीमध्ये बहुतांशी उमेदवारांना पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. यामध्ये ९३८ लोकांची प्रतीक्षा यादी बनवली होती. परंतु, ही प्रतीक्षा यादी एकच वर्षापुरती असल्याने त्यानंतर ती बाद करण्यात आली. पण प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी न्यायालयात जाऊन महापालिकेलाच आव्हान दिले. त्यामुळे या कामगार भरतीमध्ये कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा यादी न बनवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सामान्य प्रशासनाच्या वरीष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार प्रतीक्षा यादी बनवली जाणार नाही. परंतु, १३८८ उमेदवारांपैकी कोणी उमेदवार बाद झाल्यास त्याच्या जागी जो उमेदवार १३८८ च्या पुढे अग्रक्रमाने असेल त्याचा विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितलं.


हेही वाचा

महापालिकेच्या १३८८ कामगारांच्या भरतीसाठी ३ लाख ६७ हजार अर्ज


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा