Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

मुंबईतल्या 'या' भागांमध्ये पाणी येणार नाही

गावडे चौक, सेनापती बापट मार्ग इथं अस्तित्वात असलेल्या ब्रिटिशकालीन १४५० मिली मीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) मुख्य जल वाहिनी फुटली आहे.

मुंबईतल्या 'या' भागांमध्ये पाणी येणार नाही
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तर काही परिसरांमध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा होईल. गावडे चौक, सेनापती बापट मार्ग इथं अस्तित्वात असलेल्या ब्रिटिशकालीन १४५० मिली मीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) मुख्य जल वाहिनी फुटली आहे.

गळती दुरुस्त करण्याचं काम दिनांक २ व ३ डिसेंबर रोजी हाती घेण्यात येणार आहे. सदर काम दिनांक २ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरू होऊन ३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी आदल्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करुन ठेवावा. तसंच पाण्याचा काटकसरीनं वापर करून सदर जलवाहिनी गळती दुरुस्ती कालावधीमध्ये महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

'या' परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही

१. जी दक्षिण

बुधवार दिनांक २ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ३ (डिलाईल रोड);

दुपारी ३.३० ते सायं. ७

(सिटी सप्लाय)

परिसर:- ना. म. जोशी मार्ग,

बी. डी. डी. चाळ, प्रभादेवी, जनता वसाहत, आदर्श नगर, एलफिस्टन (लोअर परळ)

२. जी उत्तर

बुधवार दिनांक २ डिसेंबर रोजी सायं. ४ ते ७; तसंच सायं. ७ ते रात्री १०

परिसर : एलफिस्टन (लोअर परळ), काकासाहेब गाडगीळ मार्ग, सेनापती बापट मार्ग, गोखले मार्ग, वीर सावरकर मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टि. एच. कटारीया मार्ग, कापड बाजार, माहीम (पश्चिम) पूर्ण परिसर, माटुंगा (पश्चिम) आणि दादर (पश्चिम) परिसर

'या' परिसरांमध्ये पूर्णतः पाणीपुरवठा होणार नाही

3. जी दक्षिण

गुरुवार दिनांक ३ डिसेंबर पहाटे ४.३० ते सकाळी ७.४५ (डिलाईल रोड)

परिसर:- ना. म. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग

'या' परिसरांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबानं

४.जी दक्षिण

गुरुवार दिनांक ३ डिसेंबर पहाटे ४ ते सकाळी ७ (क्लार्क रोड)

परिसर:- धोबी घाट, सातरस्ता; या भागात कमी दाबानं पाणीपुरवठा होईलहेही वाचा

मिठी नदीचा होणार कायापालट, पालिकेची चार प्रस्तावांना मंजुरी

ठाण्याच्या राबोडी परिसरातील बंद खोलीत सिलेंडरचा स्फोट?

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा