Advertisement

मुंबईच्या 'या' भागात २८, २९ एप्रिलला पाणीपुरवठा बंद

मुंबईतील काही भागात येणाऱ्या २८ व २९ एप्रिल रोजी पाणी येणार नाही आहे. महापालिकेच्या मॅकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील पाण्याचे पंप चालू करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीची काम असल्यामुळं २८ व २९ एप्रिल रोजी पाणीपुरवठा करता येणार नसल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.

मुंबईच्या 'या' भागात २८, २९ एप्रिलला पाणीपुरवठा बंद
SHARES

मुंबईतील काही भागात येणाऱ्या २८ व २९ एप्रिल रोजी पाणी येणार नाही आहे. महापालिकेच्या मॅकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील पाण्याचे पंप चालू करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीची काम असल्यामुळं २८ व २९ एप्रिल रोजी पाणीपुरवठा करता येणार नसल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 


पाणी पुरवठा बंद

मुंबईत २९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या दिवशी निवडणुकीची कामं असल्यानं पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सायन, राओली हिल, माटुंगा, सीजीएस कॉलनी सेक्टर-७, अंटोप हिलस संगम नगर, वडाळा, बीपीटी हॉस्पिटल कॉलनी, हिंदू कॉलनी, पारसी कॉलनी या ठिकाणी पाणी येणार नाही आहे. 


नागरिकांमध्ये नाराजी

मुंबई महापालिकेच्या एफ उत्तर विभागातील के.डी. गायकवाड नगर आणि पालिका वसाहतील रहिवाशांना मुंबईत मतदानाच्या एक दिवशी आधी आणि मतदानाच्या दिवशी पाणी पुरवठा होणार नसल्याचं वॉर्ड ऑफिसकडून स्थानिक नगरसेवकांना कळवण्यात आलं आहे. मात्र, पाणी हे जीवनाश्क असल्यामुळं येथील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.   



हेही वाचा -

'राज ठाकरेच्या प्रश्नांची उत्तर त्यांच्याच स्टाईलनं देणार' - विनोद तावडे

महिला मतदारांसाठी मतदान केंद्रावर सॅनेटरी पॅडची सुविधा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा