Advertisement

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आता ऑनलाईन!


मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आता ऑनलाईन!
SHARES

दरवर्षी मुंबईसह राज्यातील लाखो रुग्णांवर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आर्थिक मदत केली जाते. पण, हीच मदत गरजू रुग्णांना जलदगतीने मिळावी आणि ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे वितरण आता ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी हा निर्णय घेतला आहे.

रुग्णांवर ज्या रुग्णालयात उपचार होणार आहेत, त्या रुग्णालयातून अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. आवश्यक त्या कागदपत्रांसह केलेल्या अर्जाची छाननी राज्यस्तरावर करण्यात येणार असून योग्य अर्जावर तातडीने निर्णय घेतला जाईल. यासाठी राज्यातील सर्व रुग्णालयांसोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे.


ही सर्व पद्धत पारदर्शी असणार आहे. रूग्णाला आपला अर्ज कुठपर्यंत पोहोचला आहे, याची माहिती सहज मिळू शकते. तसेच निधीचा वापर योग्य पद्धतीने झाला आहे का? याबाबतची माहिती देखील उपलब्ध होणार आहे. वैद्यकीय सहायता निधीचे वितरण ऑनलाईन पद्धतीने होईपर्यंत, रुग्णांच्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, पुणे या विभागीय स्तरांवर समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री

या समितीत विभागीय आयुक्तांचा प्रतिनिधी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांचा प्रतिनिधी, सामाजिक आणि रोगप्रतिबंधक उपचार शाखेचे प्रमुख यांचा समावेश असणार आहे. दरम्यान, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी शुक्रवारी वैद्यकीय निधीसाठी आलेल्या 4 हजार अर्जांवर तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.

दरवर्षी मुंबईसह राज्यातील लाखो रुग्णांवर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आर्थिक मदत केली जाते. पण, हीच मदत गरजू रुग्णांना लवकरात लवकर मिळावी आणि ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे वितरण आता ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



हेही वाचा -

ई-कारभाराच्या नावाखाली समिती अध्यक्षांच्या अधिकारांवर घाला


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा