डॉक्टरांसाठी आता ऑनलाईन कार्यशाळा!

  Mumbai
  डॉक्टरांसाठी आता ऑनलाईन कार्यशाळा!
  मुंबई  -  

  तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे वैद्यकीय क्षेत्रातही बरीच प्रगती, नवे बदल झाले आहेत. याचा फायदाही तेवढ्याच प्रमाणात डॉक्टरांना होत आहे. आता, या यादीत डॉक्टरांसाठीच्या ऑनलाईन कार्यशाळेचा समावेश होणार आहे. वर्ल्ड मेडिकल असोसिएशनने घेतलेल्या निर्णयानुसार जगभरातील डॉक्टरांना तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे.


  'डब्लूएमए'चा पुढाकार

  वैद्यकीय क्षेत्रात नवनव्या गोष्टी दररोज येत असतात. गोळ्यांपासून एखादी शस्त्रक्रिया कशी करावी? हे अनेकदा नव्याने डॉक्टरांना शिकायला मिळतं. अनेकदा वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे प्रत्येक कार्यशाळेला डॉक्टरांना उपस्थित राहणं शक्य होत नाही. याच गोष्टीमुळे वर्ल्ड मेडिकल असोसिएशनने पुढाकार घेत डॉक्टरांसाठी ऑनलाईन कार्यशाळा सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. डब्लूएमएने इंटरनॅशनल काऊंसिल ऑफ नर्सेस आणि इतर विविध क्षेत्रातील जागतिक संघटनांसोबत एकत्रितपणे हा उपक्रम सुरू केला आहे. वर्ल्ड मेडिकल असोसिएशनमध्ये 10 हजार डॉक्टरांचा समावेश आहे.


  आधी आपल्याकडे तेवढी टेक्नोलॉजी नसल्याकारणाने हा उपक्रम रखडला होता. या ऑनलाईन कार्यशाळेचे बरेच फायदे डॉक्टरांना होणार आहेत. मुख्य म्हणजे त्यांचा वेळ वाचेल. डॉक्टरांना हव्या त्याच विषयावरील ऑनलाईन कार्यशाळा सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या विषयावर लवकरच निर्णय घेऊन हा उपक्रम सुरू करणार आहोत.

  डॉ. शिवकुमार उत्तुरे, पदाधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशन

  तसंच, ऑनलाईन कार्यशाळेसाठी डॉक्टरांना स्वत:चा एक क्रमांक देण्यात येईल. ज्याद्वारे ते लॉग-ईन करू शकतील. त्यानंतर ते आपले सेशन ऐकू शकतील, असंही डॉ. उत्तुरे यांनी स्पष्ट केलं.  हेही वाचा

  सेंट जॉर्ज रुग्णालय स्वत:च्याच कर्मचाऱ्यावर उपचार करण्यात असमर्थ


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.