Advertisement

एन.व्ही रमण होणार नवे सरन्यायाधीश

सरन्यायाधीश शरद बोबडे पुढील महिन्यात २३ एप्रिलला सेवानिवृत्त होणार आहेत. केंद्रीय कायदा मंत्रालयानं सरन्यायाधीश निवडीची प्रक्रिया सुरु केली आहे.

एन.व्ही रमण होणार नवे सरन्यायाधीश
SHARES

सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. केंद्र सरकारने नवीन सरन्यायाधीश निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यापूर्वी केंद्र सरकारने त्यांना सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव सूचवण्याची सूचना केली होती. त्यानंतर बोबडे यांनी न्यायमूर्ती एन. व्ही. रमण यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे. त्यामुळे न्यायमूर्ती एन.व्ही. रमण हे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश असतील. 

सरन्यायाधीश शरद बोबडे पुढील महिन्यात २३ एप्रिलला सेवानिवृत्त होणार आहेत. केंद्रीय कायदा मंत्रालयानं सरन्यायाधीश निवडीची प्रक्रिया सुरु केली आहे. सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव सूचवण्याची सूचना केंद्र सरकारने केली होती. केंद्रीय कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी सरन्यायाधीश बोबडे यांना यासंदर्भात पत्र पाठवले होते. सरन्यायाधीश बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून रमण यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे.

सध्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली होती. निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला होता. न्यायमूर्ती एन. व्ही. रमण हे सरन्यायधीश शरद बोबडे यांच्यानंतर सुप्रीम कोर्टातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. न्यायमूर्ती रमण यांना एक वर्ष चार महिने इतका कार्यकाळ मिळणार आहे. २६ ऑगस्ट २०२२ ला ते सेवानिवृत्त होतील. 

नुथुलापटी वेंकट रमणा यांचा जन्म २७ ऑगस्ट १९५७ रोजी झाला आंध्र प्रदेशातील पोन्नावरम गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. पोन्नावरम हे गाव कृष्णा जिल्ह्यात येते. त्यांनी १० फेब्रुवारी १९८३ पासून आपल्याला वकिलीला सुरूवात केली. न्यायमूर्ती रमण यांनी यांचं बी.एस्सी, बी.एल. शिक्षण झालेलं असून, संविधान आणि फौजदारी आणि आंतरराज्य नदी कायद्यांमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलेलं आहे. 

जून २००० मध्ये त्यांची आंध्र प्रदेशच्या हायकोर्टात कायमस्वरुपी न्यायमूर्ती म्हणून निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली हायकोर्टात मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम केले. सुप्रीम कोर्टात २०१४ पासून ते कार्यरत आहेत.हेही वाचा -

  1. परमबीर सिंह यांना झटका, याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

  1. वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलीस दलातील ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा