Advertisement

'ऑक्टोबर हिट'ने मुंबईकर घामाघूम


'ऑक्टोबर हिट'ने मुंबईकर घामाघूम
SHARES

आॅक्टोबर महिना सुरू होताच मुंबईकरांना 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा बसू लागला अाहे. मागच्या दोन दिवसांपासून मुंबईत सरासरी ३३ अंश तापमान आहे. त्यामुळे कडक ऊन आणि घामाने मुंबईकर बेहाल झाले आहेत. 

या वर्षी मुंबईत समाधानकारक पाऊस झला. मात्र पाऊस माघारी परतल्याक्षणी तापमानात अचानक वाढ झाली आहे. त्यामुळेच मुंबईकरांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. कामानिमित्त भटकंती करणाऱ्या मुंबईकरांची पावले तहान शमवण्यासाठी ज्युस सेंटरकडे वळत आहेत.

या वाढलेल्या तापमानामुळे मुंबईकर आजारी होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या उन्हामुळे चक्कर येणे, मळमळणे, थकवा येणे, अंगदुखी, डोकेदुखी असे आजार होऊ शकतात.


काय काळजी घ्याल?

  • दिवसभरात भरपूर पाणी प्या  
  •  शीतपेय पिणे टाळा 
  • फ्रिजमधील पाणी पिऊ नका 
  •  उघड्यावर ठेवलेले पदार्थ खाऊ नका
  •  उघड्यावरील तळलेले पदार्थ खाण्याचे शक्यतो टाळा
  • ताप, सर्दी, खोकला झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा 


ढगाळ हवामान

पुढील २४ तास हवामान ढगाळ राहील आणि पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामानखात्याने वर्तवली केली आहे. तर मुबंई उपनगरात ठाणे, पालघरमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा