Advertisement

मुंबईकरांनाे, आता पाण्याचं 'नो टेन्शन', वर्षभर पुरेल एवढं पाणी!


मुंबईकरांनाे, आता पाण्याचं 'नो टेन्शन', वर्षभर पुरेल एवढं पाणी!
SHARES

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये तसेच तलावांमध्ये पाण्याची पातळी समाधानकारक असून मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्याइतपत पाणी जमा झाले आहे. या सर्व धरणांमध्ये १ लाख ४३ हजार ४८० कोटी लिटर एवढा पाण्याचा साठा जमा झाला आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १ लाख ४५ हजार कोटी लिटर एवढ्या पाण्याची गरज असते.

तानसा, मोडकसागर, तुळशी, विहार, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा तसेच भातसा या धरणांमधून मुंबईला दरदिवशी ३७५ कोटी लिटर एवढा पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत जो पाण्याचा एकूण साठा जमा होता, त्या आधारे पाण्याचे नियोजन केले जाते. त्यामुळे २ ऑक्टोबरला रोजी या सर्व धरणांमध्ये पाण्याचा एकूण साठा १ लाख ४३ हजार ४८० कोटी एवढा आहे. तर मागील वर्षी २ ऑक्टोबर २०१६ रोजी पाण्याचा साठा १ लाख ४४ हजार ३० कोटी लिटर एवढा होता.

यंदा पाण्याचा साठा मुबलक असून मुंबईकरांना तो वर्षभर पुरेल. मात्र, पाणी पुरवठा करत असतानाही आपल्याला भातसाच्या रिझर्व्ह साठ्यातून पाणी उचलावे लागते. पण तरीही धरणांची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे या पाण्याचे योग्यप्रकारे नियोजन करून त्याचे वितरण केले जाईल, असे उपायुक्त रमेश बांबळे यांनी स्पष्ट केले.


सर्व धरणांमधील पाण्याचा साठा

सन २०१७ : १ लाख ४३ हजार ४८० कोटी लिटर्स
सन २०१६ : १ लाख ४४ हजार ३० कोटी लिटर्स
सन २०१५ : १ लाख १४ हजार ५०० कोटी लिटर्स



हेही वाचा -

'बी' वॉर्डच्या पाणी बचतीचा मंत्र जाणून घेण्यासाठी हे वाचा...



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा