Advertisement

'बी' वॉर्डच्या पाणी बचतीचा मंत्र जाणून घेण्यासाठी हे वाचा...


'बी' वॉर्डच्या पाणी बचतीचा मंत्र जाणून घेण्यासाठी हे वाचा...
SHARES

पाणीगळती, पाणी चोरी आणि त्यात भर म्हणून मुंबईकरांकडून होणारा पाण्याचा अपव्यय यामुळं पालिका अधिकारी हैराण झाले आहेत. मुंबई स्वच्छ ठेवण्याबरोबरच 'पाण्याचा अपव्यय टाळा' या महापालिकेच्या आवाहनाकडं देखील मुंबईकर गांभीर्यानं लक्ष देत नाहीत. त्यामुळं महापालिकेनंच पुढं येऊन पाणी बचतीचं नवं टेक्निक शोधून काढलं आहे. 


काय आहे पालिकेचा पाणी बचतीचा मंत्र?

'आधी केलं मग सांगितलं’ या उक्तीप्रमाणं महापालिकेनं ‘पाणी बचती’चा मंत्र जपण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या ‘बी’ विभाग कार्यालयानं एका छोट्याशा 'वॉल्व्ह'च्या आधारे कार्यालयातील बेसुमार पाणी वापराला आळा घातला आहे. या तंत्राद्वारे दररोज 32 टक्के पाण्याची बचत करण्यात कार्यालयानं यश मिळवलं आहे. आता हाच प्रयोग महापालिकेच्या अन्य विभाग कार्यालयांमध्ये करण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू झाला आहे.

महापालिकेकडून दर दिवशी मुंबईला ३ हजार ७५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, जीर्ण जलवाहिन्या आणि पाणीचोरी यामुळं वितरण प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातं. मुंबईकरांना होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा वापर गाडी धुण्यापासून ते अन्य कारणांसाठीही केला जातो. 

साठवून ठेवलेलं पाणी दुसऱ्या दिवशी फेकून देण्याचीही प्रवृत्ती नागरिकांत दिसून येते. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गेल्या मे महिन्यात पाण्याचं दुर्भिक्ष होतं. त्या वेळी पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं. मात्र आजही मुंबईकरांकडून मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासधूस होत आहे. त्यामुळं आता पालिकेने पाणी बचतीत स्वत:च आदर्श निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.


बी वॉर्डचा अनोखा प्रयोग

महापालिकेच्या ‘बी’ विभाग कार्यालयानं पाणी वाचवण्याच्या दृष्टीने एक प्रयोग केला. विभाग कार्यालयाला प्रतिदिन येत असलेलं पाणी आणि त्याचा होत असलेला वापर यावर बारकाईनं नजर ठेवण्यात आली. कार्यालयातील नळ पूर्ण क्षमतेने सुरू केल्यानंतर प्रति मिनिटाला २० लिटर पाणी वाहून जात असल्याचं या पाहणीत दिसलं. त्यामुळे कार्यालयातील प्रत्येक नळाला एक छोट्या आकाराचा 'व्हॉल्व्ह' बसवण्यात आला. 

हा 'व्हॉल्व्ह' बसवल्यानंतर नळ पूर्ण क्षमतेनं सुरू केल्यानंतर एका मिनिटाला १० लिटर पाणी येऊ लागलं. परंतु, नळ सुरू केल्यानंतर पूर्वी इतक्याच दाबानं पाणी मिळत होतं. कार्यालयाला प्रति दिन सरासरी ३५ हजार लिटर पाणी मिळत होते. पूर्वी दर दिवशी त्यापैकी तब्बल २९,०५१ लिटर पाण्याचा वापर होत होता. पण हे 'व्हॉल्व्ह' बसवल्यामुळे दर दिवशी सुमारे १९,२७१ लिटर पाण्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास आलं.



पाणी बचतीसाठी पालिकेनेच एक पाऊल पुढे टाकून मुंबईकरांपुढे आदर्श ठेवावा या उद्देशाने हा एक छोटा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगाला यश मिळत आहे. असा प्रयोग पालिकेच्या अन्य कार्यालयांमध्ये केल्यास पाण्याची मोठी बचत होऊ शकेल. प्रत्येक मुंबईकरानेही हा बचतीचा मंत्र जपल्यास जीवनदान देणाऱ्या पाण्याची नासाडी टळेल.
- उदयकुमार शिरुरकर, साहाय्यक आयुक्त, ‘बी’ विभाग कार्यालय



हे देखील वाचा -

पावसाचे पाणी जातेय वाया, तलाव भरूनही महापालिका चिंतेत

मुंबईकरांचे पाणी महागणार!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा