होळीतून दिला पाणी बचतीचा संदेश

 Kanjurmarg
होळीतून दिला पाणी बचतीचा संदेश

कांजुरमार्ग - पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी यंदा कांजुरमार्ग पूर्व येथील अचानक मित्र मंडळातल्या युवकांनी कोरडा रंग आणि गुलाल लावून रंगपंचमी साजरी केली. तसेच इतरांनीही पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याची बचत कशी केली पाहिजे यासंदर्भात जनजागृतीही केली. त्याचबरोबर होळीच्या आगीत वाईट व्यसनांची होळी करण्यासाठी तरुण पिढीला आवाहनही केले.दरवर्षी समाजोपयोगी घटकांचा समावेश करून जनजागृतीच्या दृष्टीने नवनवीन संदेश देण्यासाठी प्रयत्न करू असा निश्चय यावेळी मंडळातील संतोष कदम, महेश वारंग, सुभाष कोचरे, गिरीश शिवमत, राजेश चोरगे या युवकांनी केल्याचं सांगितलं.

Loading Comments