Advertisement

अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनमुळे लॉकडाउनची परिस्थिती : चहल

मुंबई राज्यात सर्वात जास्त ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत. नियम न पाळल्यास लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवेल.

अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनमुळे लॉकडाउनची परिस्थिती : चहल
(Representational Image)
SHARES

ओमिक्रॉनमुळे जगभरात चिंता वाढत आहे. भारतात देखील ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई राज्यात सर्वात जास्त ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रमुख, इक्बाल सिंग चहल यांनी नागरिकांना पार्ट्या टाळण्याचं आवाहन केलं आहे. जवळ येत असलेल्या सणांमध्ये एकत्र येणं टाळावं, असं अहवालात म्हटलं आहे.

नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा चहल यांनी दिला आहे. रविवारी, १९ डिसेंबर रोजी प्राधिकरणाच्या प्रमुखांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात, नागरिकांना कोणत्याही प्रकारची गर्दी टाळण्यास, फेस मास्क घालण्यास आणि कोविड-१९ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितलं आहे.

ते पुढे म्हणाले की, नवीन प्रकारामुळे, जगभरातील अनेक देशांमधील स्थिती पुन्हा नियंत्रणाबाहेर गेली आहे. ज्यामुळे लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, सिनेमागृहे, मॉल्स यासह इतर ठिकाणी नागरिकांना कोविड-१९ प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन चहल यांनी केले आहे.

पालिका प्रमुखांनी सांगितलं की, नियमांचं उल्लंघन करणार्‍यांवर वॉर्ड स्तरावरील टीम आणि मुंबई पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई करतील. पालिकेनं सांगितलं की, महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनी देखील व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.

१४ डिसेंबर रोजी, मुंबई पोलिसांनी एक अधिसूचना जारी केली होती. ज्यामध्ये निर्बंध आणि नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. रविवारपर्यंत, महाराष्ट्रात ओमिक्रॉन प्रकाराची ५४ रुग्ण नोंदवली गेली. त्यापैकी २२ मुंबईतील आहेत.हेही वाचा

New Year Party: 'थर्टी फर्स्ट'च्या निर्बंधांबाबत महापौर किशोरी पेडणेकरांचं स्पष्टीकरण

नाताळ, नववर्ष पार्ट्यांवर महापालिका ठेवणार नजर; ४८ पथके तैनात

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा