Advertisement

गृहमंत्र्यांविरोधात अश्लील पोस्ट करणा-याला अटक

खज्जे हा उस्मानाबाद येथील रहिवासी असून कंपनीच्या कामानिमित्त पुण्यात वास्तव्याला आहे.

गृहमंत्र्यांविरोधात अश्लील पोस्ट करणा-याला अटक
SHARES

मुंबईत काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री आणि महिला प्रतिनिधीबाबत सोशल मिडियावर अश्लिल भाषेत पोस्ट टाकणाऱ्या विकृतास सायबर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. श्रीशैल शरणप्पा खज्जे (२६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा उस्मानाबाद येथील केसर जवळगाव येथील रहिवासी आहे. सध्या तो पुण्यातील चिखली येथे वास्तव्याला होता.

हेही वाचाः- अमित ठाकरेंनी घेतली सरकारची बाजू! म्हणाले, पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा...

खज्जे याने काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर अप्पा केसर जवळगेकर या फेसबुक प्रोफाईलवरून राज्याचे गृहमंत्री तसेच महिला प्रतिनिधींविरोधात अश्लील पोस्ट टाकली होती. या प्रकरणाती गंभीर दखलही सायबर पोलिसांनी घेत, संबधित आरोपी विरोधात सायबर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ५००, ५०५(२) व ५०९ सह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी माहिती घेतली असता त्या फेसबुक प्रोफाईलचा वापरकर्ता पुणे चिखली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

हेही वाचाः- MPSC परीक्षा पुढे ढकलताना फक्त एकाच जातीचा विचार, बाकीच्याचं काय?- प्रकाश आंबेडकर

 त्यानुसार रविवारी त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याला गुन्हयात सहभाग असल्याचे कबुल केले. खज्जे हा उस्मानाबाद येथील रहिवासी असून कंपनीच्या कामानिमित्त पुण्यात वास्तव्याला आहे. त्याने लॉकडाऊनच्या काळात ही पोस्ट केली होती. त्यानंतर त्याला रविवारी याप्रकरणी अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा