Advertisement

बीडीडी चाळीत स्लॅब कोसळून पोलिस पत्नी जखमी


बीडीडी चाळीत स्लॅब कोसळून पोलिस पत्नी जखमी
SHARES

वरळीतल्या बीडीडी चाळीतील सार्वजनिक शौचालयाचा स्लॅब कोसळून एक पोलिस पत्नी गंभीर जखमी झाली आहे. वंदना कदम असं त्यांचं नाव असून त्या वरळीतील बीडीडी पोलिस वसाहतीमध्ये चाळ क्रमांक २८ मध्ये दुसऱ्या माजल्यावर राहतात.

मंगळवारी सकाळी ६.३० च्या सुमारास सार्वजनिक शौचालयात गेल्या असता, वंदना यांच्या अंगावर शौचालयातील स्लॅब कोसळला. त्यामुळे त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

याप्रकरणी वंदना यांचा मुलगा राजन कदम यांनी बीडीडी चाळींच्या दुरुस्तीचं काम करणाऱ्या पीडब्ल्यूडी विभागाकडे संबंधीत घटनेची तक्रार केली आहे. याशिवाय वरळीतील स्थानिक आमदार सुनिल शिंदे यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केल्याचं राजन यांनी सांगितलं.

मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी वडाळ्यात संरक्षक भिंत कोसळली, मरीन लाईन्स येथील काळबादेवी परिसरातील इमारतीचा काही भाग कोसळला, तसंच भूमिगत पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळं मेट्रो सिनेमासमोरील रस्ता खचला, या  घटनांमुळं मुंबकरांमध्ये घबराटीचं वातावरण आहे.


हेही वाचा - 

वांद्र्यात इमारतीची लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू

घाटकोपरमध्ये लिफ्ट खाली कोसळून ४ जखमी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा