Advertisement

तो काळा दिवस पुन्हा येऊ नये...

कांजूरमार्गच्या मिराशी नगरमध्ये राहणाऱ्या शुभलता शेट्टी आणि नेहरू नगरमध्ये राहणाऱ्या सुजाता शेट्टी या दोघींची चांगली मैत्री जमली होती. अगदी बाजारात जाण्यापासून ते शॉपिंगला जाण्यापर्यंत सर्वच गोष्टी त्या एकत्रीत करायच्या. त्यानुसार त्यांनी२९ सप्टेंबरला फुल खरेदीचा प्लॅन आखला.

तो काळा दिवस पुन्हा येऊ नये...
SHARES

मुंबईतील परळ-एल्फिन्स्टन (प्रभादेवी) रेल्वे स्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी झाल्याची घटना २९ सप्टेंबर २०१७ ला घडली होती. या पूल दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या दुर्घटनेत २३ प्रवाशांचा आपला जीव गमवावा लागला होता. तर जवळपास ३९ प्रवासी जखमी झाले होते. मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळालेली असली तरी त्यांचं दु:ख प्रचंड आहे. त्या वाईट दिवसाच्या स्मृती अाठवताना शेट्टी कुटुंबाची अजूनही घालमेल होत अाहे.


मैत्रिणींवर काळाचा घाला

कांजूरमार्गच्या मिराशी नगरमध्ये राहणाऱ्या शुभलता शेट्टी आणि नेहरू नगरमध्ये राहणाऱ्या सुजाता शेट्टी या दोघींची चांगली मैत्री जमली होती. अगदी बाजारात जाण्यापासून ते शॉपिंगला जाण्यापर्यंत सर्वच गोष्टी त्या एकत्रीत करायच्या. त्यानुसार त्यांनी२९ सप्टेंबरला फुल खरेदीचा प्लॅन आखला. यानुसार २९ सप्टेंबरला सकाळी लवकर त्या दसऱ्यानिमित्तानं फुल खरेदीसाठी परेलला गेल्या. नेहमीप्रमाण फुल खरेदी झाल्यानंतर त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. आणि तिथचं काळानं घाला घातला. 


मंगळसूत्र गायबच

मुसळधार कोसळणारा पाऊस व सकाळची गर्दी यामुळं या पुलावर गर्दी झाली होती. या गर्दीत त्या दोघीही अडकल्या आणि श्वास गुदमरल्यामुऴे कांजूरमार्ग येथे राहणाऱ्या या दोन मैत्रिणींना आपला जीव गमवावा लागला. माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट म्हणजे त्या दोघींनी अंगावर काही दागिने घातले होते. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर अनेकांनी हे दागिने काढून घेतले. त्यानंतर त्या दोघींचे इतर दागिने सापडले असले तरी त्यांचं मंगळसूत्र मिळालेलं नाही. याबाबत पोलिस स्थानकात अनेकदा तक्रारी नोंदवल्यानंतर पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची दाद शेट्टी कुटुंबांना मिळालेली नाही. या दोन्ही कुटुंबाला सरकारकडून नुकसान भरपाई पाच ते सहा महिन्यात मिळाली असली तरी माणूस गेल्याच दु:ख कधीही भरून येण्सायारख नाही. शुभलता यांना दोन मुली असून सुजाता यांना एक मुलगी आहे.


एल्फिन्स्टन-परळ स्थानकादरम्यान झालेल्या या दुर्घटनेमुळं माझ्या जवळच्या नातेवाईकांप्रमाणे असलेल्या शुभलता व सुजाता यांचा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळं शेट्टी कुटुंबांची मानसिक स्थिती खचलेली आहे. नवरात्रीच्या दिवसात केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशी घटना होणं हे अत्यंत दुर्देैवी आहे. शेट्टी कुटुंबासाठी हा काळा दिवस असून तो दिवस पुन्हा कधीच कोणावर येऊ नये.
 -गणेश शेट्टी, नातेवाईक



हेही वाचा -

बोरिवली स्थानक ठरलं पहिलं ‘अंधमित्र’ रेल्वे स्थानक

म्हाडाकडून गरीबांची चेष्टा! अत्यल्प गटातील घरं ३० लाख ७१ हजारांत!



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा