अखेर कांदा १५० रुपये प्रति किलो

मागील अनेक दिवस सतत दरांच्या किंमतीत वाढ होणाऱ्या कांद्याच्या दराने अखेर बाजारात १५० रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला आहे.

SHARE

मागील अनेक दिवस सतत दरांच्या किंमतीत वाढ होणाऱ्या कांद्याच्या दराने अखेर बाजारात १५० रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला आहे. अवकाळी पावसामुळं कांद्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानाचा फटका कांद्याच्या किंमतीवर बसला आहे. मुंबईत तुर्कीहून कांदा आयात होत असला तरी त्याला विलंब होणार आहे. त्यात कांद्याचा थोडाफार चांगला असलेला जुना माल संपत आला आहे. तर नवीन मालाची आवक फार कमी आहे. त्यामुळं दर प्रचंड वाढलं आहे.

१५० रु. प्रति किलो

लांबलेला पावसाळा, अधिक प्रमाणात पडलेला अवकाळी पाऊस, वादळी वातावरण यामुळं कांद्याचं पीक यंदा खराब झाले. त्यामुळं कांद्याची आवक रोडावून दर हळूहळू वाढू लागले. सुरुवातीला सप्टेंबर अखेरीस ४० ते ५० रुपयांदरम्यान असलेल्या कांद्याच्या किंमती ऑक्टोबर महिन्यात ६० रुपये झाली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ८० रुपयांवर असताना अखेरच्या आठवड्यात तो १००-१२० रुपयांच्या घरात गेला. मात्र, डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच कांद्यानं १५० रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला आहे.

दर वधारले

मुंबईसाठी वाशीच्या बाजारात दररोज ६० ते ७० वाहन कांदा येतो. पण आता हा माल संपत आल्यानं ही वाहनं अर्धी रिकामी आहेत. त्यामुळं कांद्याचे दर वधारले आहेत. घाऊक बाजारात मागील आठवड्यात कांदा ८० ते ९० रुपये किलो होता. तो मंगळवारी १२० पर्यंत गेला. त्यामुळेच सर्वसामान्य ग्राहकांना किलोसाठी १५० रुपये मोजावे लागत आहेत.हेही वाचा -

पंकजा मुंडे ‘त्या’ फेसबुक पोस्टवर म्हणाल्या

डोंबिवलीतील लोकलच्या गर्दीचा मुद्दा लोकसभेतसंबंधित विषय
ताज्या बातम्या