Advertisement

मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच सशुल्क वाहनतळ


मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच सशुल्क वाहनतळ
SHARES

मुंबईतील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता सशुल्क वाहनतळांची मागणी आता वाहतूक पोलिसांकडूनच केली जात आहे. त्यामुळे आता वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी महापालिकेचे विभाग कार्यालय आणि वाहतूक पोलीस यांच्या समन्वयाने रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर रस्त्यावर रस्त्यावरील वाहनतळ चालवण्याचे धोरण अवलंबले असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यामुळे लवकरच ही वाहनतळ सुरु करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.


निविदेची प्रक्रिया सुरू

मुंबई महापालिकेने जानेवारी २०१५ मध्ये सशुल्क वाहनतळ धोरण बनवले असून या धोरणाला प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. परंतु ही स्थगिती उठवण्यात आल्यानंतर महापालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत या धोरणाची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरु केली जात आहे. यासाठी ‘ए’ विभागातील सशुल्क वाहनतळासाठी निविदा काढण्याची प्रक्रीया सुरु असून त्यामध्ये महिला बचत गट, सुशिक्षित बेरोजगार आणि खुल्या गटांमध्ये विभागून हे कंत्राट दिले जाणार आहे. मात्र, एकाबाजुला वाहतूक पोलीस रस्त्यालगत वाहनतळ बनवण्याची मागणी करत असतानाच ‘ए विभागात या निवासी वाहनतळाला परवानगी देण्यास टाळाटाळ करतानाच दिसत आहेत.


सध्या विभाग स्तरावरच

मुंबईमध्ये ९१ ठिकाणी अर्थात ११ हजार २७१ वाहने उभी करण्याची क्षमता असलेले रस्त्यांलगतची वाहनतळे आहेत. तर १७ ठिकाणी बंदिस्त ठिकाणी सार्वजनिक वाहनतळ आहेत. याशिवाय २९ ठिकाणी वाहनतळ योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. परंतु सध्या विभाग स्तरावरच निविदा मागवून वाहनतळांचे कंत्राट दिले जात आहे. ‘ए’ विभागात प्रायोगिक तत्वावर सशुल्क वाहनतळ योजना राबवण्यात येत आहे. त्यानंतर संपूर्ण मुंबईत राबवण्यात येणार असल्याचे रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी स्पष्ट केले.


रुग्णालय परिसरात सुविधा हवी

मुंबईतील सर्व रुग्णालयांबाहेरील रस्त्यावर खासगी वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी काँग्रेसचे माजी नगरसेवक परमिंदर भामरा यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. मात्र, विभाग कार्यालय व वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने प्रायोगिक तत्वावर रस्त्यांवरील वाहनतळ चालवण्याचे धोरण अवलंबवले जाणार असून ही ठिकाणे जर रुग्णालयाच्या जवळपासच्या परिसरात येत असल्यास तेथे योग्य ते शुल्क भरुन रुग्णांचे नातेवाईक त्यांची वाहने उभी करू शकतात,असे चिठारे यांनी स्पष्ट केले. परंतु रुग्णांच्या नातेवाईकांना वाहने उभी करण्यासाठी मोफत सुविधा सध्याच्या वाहनतळाच्या धोरणानुसार उपलब्ध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.



हेही वाचा -

रहिवासी वाहनतळ ऐच्छिक

भूमिगत वाहनतळासाठी सल्लागाराची निवड



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा