Advertisement

पनवेलमध्ये आता घरपोच दारु मिळणार

पनवेल महापालिका क्षेत्रात रेड झोनमुळे मद्यविक्री बंद होती. मात्र, आता महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी मद्यविक्रीला परवानगी दिली आहे.

पनवेलमध्ये आता घरपोच दारु मिळणार
SHARES

पनवेलमध्ये आता घरपोच दारू मिळणार आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात रेड झोनमुळे मद्यविक्री बंद होती. मात्र, आता महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या आदेशानंतर सुरक्षेच्या कारणास्तव सक्षम अधिकारी म्हणून आयुक्त गणेश देशमुख यांनी परवानगी दिली नव्हती. 

रायगड जिल्ह्याला ऑरेंज झोन घोषित केले आहे. मात्र, पनवेल तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पनवेलमध्ये मद्यविक्री करणाऱ्या दुकानांना परवानगी दिली नव्हती. त्यानंतर पनवेल तालुक्याच्या जवळच्या तालुक्यांमधून दारूविक्री सुरू असलेल्या ठिकाणाहून बेकायदा दारू आणली जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून दिसून आलं.

 पनवेल महापालिका क्षेत्रात मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्याचा निर्णय अखेर पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतला. ग्राहकांना ऑनलाइन बुकिंग करून दारू खरेदी करता येणार आहे. दुकानाच्या काऊंटरवर दारू खरेदी करता येणार नाही. याशिवाय शहरी भागात महापालिकेने घोषित केलेल्या कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातही दारू विक्री करता येणार नाही. उत्पादन शुल्क विभागाने घालून दिलेल्या अटींप्रमाणे दारू विक्री करणं बंधनकारक असेल.



हेही वाचा -

महाराष्ट्रात आता फक्त दोनच झोन, 'असे' आहेत नवीन मार्गदर्शक तत्वं, वाचा...

सलग दुसऱ्या वर्षी नवी मुंबई ठरलं 'कचरामुक्त शहर'

१ जूनपासून २०० नॉन एसी रेल्वेगाड्या नियोजित वेळेनुसार धावणार




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा