Advertisement

मुंबईत पार्किंग ठेकेदारांची मनमानी, छापील पावतीवर हाताने लिहिलं जातं शुल्क

मुंबईत महापालिकने अनेक ठिकाणी पार्किंगचे ठेके खासगी ठेकेदारांना दिले आहेत. मात्र हे ठेकेदार मनमानी पद्धतीने पार्किंगचे नियम धाब्यावर बसवत असल्याचं दिसून येत आहे.

मुंबईत पार्किंग ठेकेदारांची मनमानी, छापील पावतीवर हाताने लिहिलं जातं शुल्क
SHARES

मुंबई महापालिकेने मुंबईत नवीन पार्किंग धोरण लागू केलं आहे. या धोरणानुसार, जर वाहनचालकाने आपले वाहन नो पार्किंग झोनमध्ये उभे केल्यास त्याला तब्बल १० हजार रुपयांचा दंड द्यावा लागणार आहे. जर वाहनचालकाने दंड भरला नाही तर वेळोवेळी हा दंड वाढणारही आहे. मुंबईत महापालिकने अनेक ठिकाणी पार्किंगचे ठेके खासगी ठेकेदारांना दिले आहेत. मात्र हे ठेकेदार मनमानी पद्धतीने पार्किंगचे नियम धाब्यावर बसवत असल्याचं दिसून येत आहे.  


पार्किंग पावतीवर रक्कम नाही

फोर्ट येथे पीएम रोडवर पालिकेने ओम साईनाथ इंटरप्रायजेस या कंपनीला पार्किंगचा ठेका दिला आहे. पालिकेच्या नियमानुसार मुंबईतील कोणत्याही वाहनतळावर वाहन पार्किंग गेल्यास वाहनचालकाला छापील पावती दिली जाते. या पावतीवर पार्किंगसाठी किती शुल्क आहे हे नमूद केलेले असते. मात्र, पीएम रोडवरील वाहनतळावर वाहनचालकांना जी छापील पावती दिली जाते त्यावर शुल्क नमूद केलेले नाही. पावतीवर पेनाने शुल्क लिहिले जाते. पूर्ण पावती छापील असते. मात्र, फक्त त्यावर शुल्क हाताने का लिहिले जाते, असा प्रश्न वाहनचालकांना पडतो. याची विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरं दिली जातात. ठेकेदार मनमानीपणे ज्यादा शुल्कही आकारण्याची शक्यता असते. पावतीवर शुल्काचा आकडा प्रिंटेड नसल्याने वाहनतळाच्या उत्पन्नाची माहितीही मिळू शकणार नाही. याचा फायदा ठेकेदाराला कर चोरी करण्यासाठीही होऊ शकतो. 



फूटपाथवरही पार्किंग

जहांगीर आर्ट गॅलरीजवळ पालिकेने साई सिद्धी एसबी या कंपनीला पार्किंगचा ठेका दिला आहे. मात्र, या ठिकाणी फूटपाथवरही कार पार्क केल्या जातात. यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. येथील फूटपाथवर कायमच कार पार्किंग केल्या जात असल्याचं येथील नागरिकांनी सांगितलं. जे कार पार्क करतात त्यांच्याकडून साई सिद्धी एसबीचा ठेकेदार पैसेही घेत असल्याचं एका वाहनचालकाने सांगितलं. 


ठेकेदारांवर कारवाईची गरज

मुंबईत अवैध पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने मोठा दंड आकारण्यास सुरूवात केली आहे. मात्र पालिकेने ठेकेदारांच्या मनमानीवरही आळा घालणं आवश्यक आहे. पार्किंग नियमांचं पालन न करणाऱ्या अशा ठेकेदारांवरही पालिकेने कडक कारवाई करण्याची गरज आहे. 



हेही वाचा  -

गुरूवारी ‘या’ भागात होणार पाणीकपात

पायल तडवी आत्महत्याप्रकरणी दोषारोपपत्र सादर होणार




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा