Advertisement

धारावीत घराचा भाग कोसळून ८ जण जखमी

धारावीतील शेषवाडी येथे राहत्या घराचा भाग कोसळून ८ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. गुरूवारी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला.

धारावीत घराचा भाग कोसळून ८ जण जखमी
SHARES

धारावीतील शेषवाडी येथे राहत्या घराचा भाग कोसळून ८ जण जखमी झाल्याची घटना घडली. गुरूवारी दुपारी १.३७ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेमधील जखमींना सायन रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आलं आहे. 


जखमींची नावे

मोहम्मद रफिक (२२), जहान आरा खान(४०), मोहम्मद रिझवान शेख (१५), मोहम्मद राहजीत (२२), पप्पू यादव (२२), नवल राय (२४), रश्मी खान (५) आणि रुकीया बानू (१७) अशी या जखमींची नावे आहेत. धारावीतील ६० फिट रोडवरील शेषेवाडी येथील न्यू बस्ती येथील राहत्या घराचा भाग कोसळला. दरम्यान, या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घराच्या बांधकामासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती.हेही वाचा -

'राज ठाकरेंनी २० वर्षांच्या मुलीला घेऊन राजकारण करु नये’ - किरीट सोमय्याRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा