Advertisement

'राज ठाकरेंनी २० वर्षांच्या मुलीला घेऊन राजकारण करु नये’ - किरीट सोमय्या

बुधवारी झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी भाजपचे किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली. रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला कुठलीही मदत न करता केवळ प्रसिद्धीचे भांडवल करण्यात आल्याचे म्हणत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तिला स्टेजवर आणले. यावर आम्ही मोदी सरकारच्या काळात प्लॅटफॉर्मची उंची वाढवली. आता राज यांची राजकीय उंची कमी झाली. त्यामुळे २० वर्षांच्या मुलीला घेऊन राजकारण करू नका, असा टोला भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.

'राज ठाकरेंनी २० वर्षांच्या मुलीला घेऊन राजकारण करु नये’ - किरीट सोमय्या
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात सभा घेत त्यांच्यावर भाजप सरकारची पोलखोल करत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या सभांमध्ये राज ठाकरेंनी वेगवेगळ्या व्हिडीओ दाखवून भाजप सरकारची पोलखोल केली आहे. मात्र, बुधवारी झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी भाजपचे किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली. रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला कुठलीही मदत न करता केवळ प्रसिद्धीचे भांडवल करण्यात आल्याचे म्हणत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तिला स्टेजवर आणले. यावर आम्ही मोदी सरकारच्या काळात प्लॅटफॉर्मची उंची वाढवली. आता राज यांची राजकीय उंची कमी झाली. त्यामुळे २० वर्षांच्या मुलीला घेऊन राजकारण करू नका, असा टोला भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.


नोकरीपासून वंचित

मागील ५ वर्षांपूर्वी झालेल्या रेल्वे अपघातात मोनिका मोरेला तिचे दोन्ही हात गमवावे लागले होते. त्यावेळी किरीट सोमय्यांच्या पुढाकारानं तिला कृत्रिम हात बसविण्यात आले होते. काही दिवसांनंतर मोनिका मोरे ‘स्वच्छ भारत अभियाना’ची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर झाली. मात्र, यावेळी तिनं पदवी मिळाल्यानंतर देखील नोकरीपासून वंचित असल्याचा आरोप केला. घर, नोकरी देण्याचं आश्वासन तिला देण्यात आलं होतं. त्यापैकी काहीही देण्यात आलं नसल्याचं तिचं म्हणणं आहे. काही महिन्यांपूर्वीच वडिलांचं निधन झालं असून, घराची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळं सध्या मदतीसाठी कोणीही पुढं आलं नसल्याचं तिनं सांगितलं. त्यानंतर राज यांनी तिला स्टेजवर आणत, किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला.


थेट सोमय्यांशी लढावं

राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपानंतर किरीट सोमय्यांनी त्यांच्यावर गुरूवारी निशाना साधला. 'राज यांची राजकीय उंची कमी झाली आहे. त्यांनी थेट सोमय्यांशी लढावं, २० वर्षांच्या मुलीच्या आडून राजकारण करू नये. मोनिकाला मदत केली. काही महिन्यांपूर्वी ती नोकरीसाठी माझ्याकडं आली होती. तिला ३ कॉल आले, ऑफर लेटरही आले होते. तिला नोकरी हवी असल्यास आपण सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा. राज ठाकरे यांनी सुद्धा तशी मदत केल्यास बरं होईल’, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.



हेही वाचा -

मुंबईच्या 'या' भागात २८, २९ एप्रिलला पाणीपुरवठा बंद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा