Advertisement

ONGC चे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले: 4 ठार, 5 जण बचावले

पवन हंस कंपनीच्या या हेलिकॉप्टरमध्ये 2 वैमानिकांसह 9 जण होते.

ONGC चे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले: 4 ठार, 5 जण बचावले
(Representational Image)
SHARES

मुंबईतील तेल व नैसर्गिक वायू महामंडळाच्या (ONGC) हेलिकॉप्टरला मंगळवारी तांत्रिक बिघाडामुळे अरबी समुद्रात आपत्कालीन लँडिंग करावे लागले. पवन हंस कंपनीच्या या हेलिकॉप्टरमध्ये 2 वैमानिकांसह 9 जण होते. यापैकी 5 जणांना वाचवण्यात यश आले, तर 4 जणांचा मृत्यू झाला.

समुद्रात इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतर हेलिकॉप्टर आपल्या फ्लोटर्सच्या मदतीने काही वेळ तरंगत राहिले. या काळात नौदलाच्या हेलिकॉप्टरने सर्व 9 जणांची सुटका केली. यापैकी 4 जण बेशुद्धावस्थेत होते. त्यांना उपचारासाठी मुंबईतील रूग्णालयात पाठवण्यात आले असता तिथे उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले.

पवन हंस हेलिकॉप्टरमध्ये नेहमीच इंजिन समस्या, तेल गळती व सेन्सरशी संबंधित समस्या असल्याचा आरोप अनेकदा केला आहे. आतापर्यंत या कंपनीच्या हेलिकॉप्टरशी संबंधित तब्बल 20 अपघात झाले असून, त्यात 91 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. यात 60 प्रवाशी, 27 पायलट आणि 4 क्रू मेंबर्सचा समावेश आहे.

2010 ते 2012 पर्यंत 12 हेलिकॉप्टर अपघात झाले. त्यातील 10 अपघात पवनहंस हेलिकॉप्टरचे होते. या अपघातांत 55 जणांना आपला जीव गमवावा लागला.

जुलै 1988 मध्ये पहिल्यांदा पवनहंस हेलिकॉप्टरचा अपघात झाला. जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवी येथे झालेल्या या अपघातात 2 वैमानिकांसह 7 जणांचा मृत्यू झाला होता.

2011 मध्ये पवनहंस हेलिकॉप्टरच्या अपघातात सर्वाधिक 31 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दोरजी खांडू यांच्या वेदनादायी मृत्यूचाही समावेश आहे.

30 एप्रिल 2011 रोजी खांडू 4 सीट्स व 1 इंजिन असणाऱ्या पवनहंसच्या AS-B350-B3 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर खांडूंसह 5 जणांचा बळी गेला.

13 जानेवारी 2018 रोजी पवनहंस हेलिकॉप्टर मुंबईतील जुहू विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच बेपत्ता झाले होते. या हेलिकॉप्टरमध्ये ONGC च्या अधिकाऱ्यांसह 5 जण प्रवास करत होते. या अपघातातही सर्वांचा मृत्यू झाला होता.हेही वाचा

कुर्ला इमारत दुर्घटना: कंत्राटदाराला अटक, मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून आर्थिक मदत

गोरेगावमधील शाळेत मध्यरात्री घुसला बिबट्या, शाळा आज बंद

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा