Advertisement

चिअर्स! वाइन शाॅप्स रात्री साडे अकरापर्यंत सुरू राहणार


चिअर्स! वाइन शाॅप्स रात्री साडे अकरापर्यंत सुरू राहणार
SHARES

कमला मिल्स कंपाऊंडमधील अग्नितांडवानंतर अनेक बार, पब अाणि हाॅटेलमालकांचे धाबे दणाणले असताना अाणि अन्य नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत असताना अाता मद्यप्रेमींसाठी एक खुशखबर अाहे. रात्री १० वाजेपर्यंत उघडी असणारी देशी व विदेशी अशी सर्वप्रकारच्या दारूची दुकानं म्हणजेच वाइन शाॅप्स अाता रात्री साडे अकरा वाजेपर्यंत खुली राहणार अाहेत. मात्र मद्य पुरवले जाणारे हुक्का पार्लर, परमिट रूम, डिस्को थेक अाता केवळ मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली अाहे.



चित्रपटगृह एक वाजेपर्यंतच खुले

बियर बार, परमिट रूम, हुक्का पार्लर, डिस्को हे सकाळी साडेअकरा वाजता उघडण्यास आणि मध्यरात्री दीड वाजता बंद करण्यास परवानगी असेल. याशिवाय दारू व सर्व प्रकारची मद्यांची दुकाने ही रात्री साडेअकरा वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. मात्र चित्रपटगृह मध्यरात्री एक वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याचं महापालिका दुकान व आस्थापना विभागानं स्पष्ट केलं अाहे.


कायद्यात झाला बदल

महाराष्ट्र शासनाच्याा अधिसुचनेनुसार महाराष्ट्र (दुकाने व आस्थाापना) अधिनियम १९४८ रद्द करण्यात आलेला आहे. त्याऐवजी महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ हा कायदा लागू झालेला आहे. त्यामुळे १ ते ९ कामगार संख्या असलेल्या आस्थापनांना नोंदणीकरण, नूतनीकरण, बदल इत्यादींबाबत ऑनलाईन अर्ज स्वीकारणे बंद करण्यात आलेले आहे. तर १० व त्याापेक्षा जास्त कामगार संख्या असलेल्या आस्थापनांना नोंदणीकरण, नुतनीकरण, बदल इत्यादीबाबत ऑनलाईन सेवा सुरू राहील.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा