Advertisement

तुमच्या घरात पोपट अाहे? होऊ शकते कारवाई!

वन विभाग पाेपटांची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या तसंच खेळामध्ये पोपटांचा वापर करणाऱ्यांविरोधात ही कारवाई करत आहे. ज्यांच्याकडे पाळीव पोपट आहे, अशा व्यक्तींनी हे पाळीव पोपट आठवड्याभरात वन विभागाकडे सुपूर्द करावेत, असी सूचना वन विभागाने केली आहे.

तुमच्या घरात पोपट अाहे? होऊ शकते कारवाई!
SHARES

घरात श्वान, मांजर पाळण्यासोबतच पक्षी पाळण्याचीही अनेकांना हौस असते. मात्र तुम्ही घरात पोपट पाळला असेल, तर ही हौस तुम्हाला महागात पडू शकते. कारण पाळीव पोपट आठवड्याभरात आणून जमा करण्याची सूचना वन विभागाने केली आहे. तसं न केल्यास
वन्य जीव संवर्धन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही वन विभागाने दिला आहे.



पोपट विक्रेत्यांवर कारवाई

ठाणे वन विभागाने मालाड इथं पोपटांची विक्री करणाऱ्या दोघा जणांना नुकतंच ताब्यात घेतलं होतं. तर त्याअगोदर टिटवाळा इथूनही भविष्य सांगणाऱ्या पोपटांची विक्री करणाऱ्या एकाला ताब्यात घेतलं होतं. दंडात्मक कारवाई केल्यावर दोघांना सोडून देण्यात आलं.


काय म्हणतो कायदा?

वन्यजीव संवर्धन कायदा १९७२ नुसार भारतीय पोपट पाळण्यास आणि त्यांचा खेळ मांडण्यास बंदी आहे. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला दंडात्मक कारवाई किंवा वेळ पडल्यास तुरूंगवास देखील होऊ शकतो. त्यानुसार वन विभाग पाेपटांची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या तसंच खेळामध्ये पोपटांचा वापर करणाऱ्यांविरोधात ही कारवाई करत आहे. ज्यांच्याकडे पाळीव पोपट आहे, अशा व्यक्तींनी हे पाळीव पोपट आठवड्याभरात वन विभागाकडे सुपूर्द करावेत, असी सूचना वन विभागाने केली आहे.


पोपटाचं नैसर्गिक अधिवास जंगल आहे. पोपटाला बंदीस्त करून ठेवणं कायद्यानं गुन्हा आहे. त्यामुळं पोपट घरी पाळू नये. त्याचप्रमाणं ज्यांनी घरी पोपट पाळले असतील, त्यांनी हे पोपट आठवड्याभरात वनविभागाच्या ताब्यात द्यावेत. तसं न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- जितेंद्र रामगावकर, वन उपरक्षक, ठाणे विभाग



हेही वाचा-

निवृत्त कर्मचाऱ्यांचा विमा योजनेतील औषधांवर डल्ला

सहारा स्टारमध्ये ४२ जुगाऱ्यांना अटक!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा