Advertisement

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सलग नवव्या दिवशी वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सलग नवव्या दिवशी पेट्रोल, डिझेल महाग झालं आहे.

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सलग नवव्या दिवशी वाढ
SHARES

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सलग नवव्या दिवशी पेट्रोल, डिझेल महाग झालं आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर २५ पेसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर २६ पैशांची वाढ करण्यात आली आहे.

मुंबईत आता पेट्रोल ९६ रुपयांना तर डिझेल ८६ रुपये ९८ पैशांना मिळत आहे. सोमवारी पेट्रोलचा दर ९५ रुपये ४६ पैसे, तर मंगळवारी ९५ रुपये ७५ पैसे होता. डिझेलचा दर सोमवारी  ८६ रुपये ३४ पैसे तर मंगळवारी ८६ रुपये ७२ पैसे होता.

दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर २५ पैशांनी वाढले आहेत. येथे पेट्रोलचा भाव प्रतिलीटर ८९ रुपये ५४ पैसे आणि डिझेलचा दर ७९ रुपये ९५ पैसे झाला आहे. मागील १० दिवसांमध्ये इंधनाचे दर तीन रुपयांनी वाढले आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती २०२१ मध्ये आतापर्यंत २० वेळ वाढवण्यात आल्या आहेत. पेट्रोल ५ रुपये ५८ पैसे तर डिझेल ५ रुपये ८३ पैसे महागलं आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही शहरांमध्ये प्रीमियम पेट्रोलने शंभरी पार केली आहे. मेघालय सरकारने मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी केला आहे. त्यामुळे मेघालयमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पाच रुपयांनी कमी झाल्या आहेत.



हेही वाचा -

IRCTC कडून नवीन पेमेंट गेटवे लाँच

राज्यात ७ लाख ४१ हजार ३७० लाभार्थ्यांना कोविड लसीकरण



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा