Advertisement

१५ दिवसांत १३ वेळा पेट्रोल-डिझेलची दरवाढ, मुंबईत 'इतकी' वाढ

गेल्या दोन आठवड्यात एकूण ९.२० रुपयांनी पेट्रोल प्रति लिटर वाढले आहेत.

१५ दिवसांत १३ वेळा पेट्रोल-डिझेलची दरवाढ, मुंबईत 'इतकी' वाढ
SHARES

सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेल किमतीतील वाढ (Petrol-Diesel Hike) सतत सुरू आहे. मंगळवारी पेट्रोल-डिझेल किमतीत ८० पैसे प्रति लीटरची (Petrol-Diesel Price Today) वाढ झाली आहे. कंपन्या त्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई होईपर्यंत इंधन दर वाढवू शकतात.

तेल कंपन्यांनी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल-डिझेल दोन्हीच्या किमतीत ८० पैसे प्रति लीटरची वाढ केली आहे. दिल्लीत आता पेट्रोल १०४.६१ रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल ९६ रुपये लीटरवर पोहोचलं आहे.

मुंबईत पेट्रोल ११९.६७ रुपयांवर पोहोचलं आहे. तर डिझेल १०४ रुपये लीटरजवळ आहे. पुण्यात आज पेट्रोल दरात ८६ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यात पेट्रोल दर ११९.१३ रुपये आहे. तर डिझेल १०१.८४ रुपये लीटर आहे.

कंपन्यांनी १५ दिवसांत १३ वेळा इंधन दरवाढ केली आहे. आतापर्यंत तब्बल ९.४० पैशांनी दर वाढवले आहेत.

चार महानगरात पेट्रोल-डिझेल दर -

  • मुंबईमध्ये पेट्रोल ११९.६७ रुपये आणि डिझेल १०३.९२ रुपये प्रति लीटर
  • दिल्लीत पेट्रोल १०४.६१ रुपये आणि डिझेल ९५.८७ रुपये प्रति लीटर
  • चेन्नईत पेट्रोल ११०.०९ रुपये आणि डिझेल १००.१८ रुपये प्रति लीटर
  • कोलकातामध्ये पेट्रोल ११४.२८ रुपये आणि डिझेल ९९.०२ रुपये प्रति लीटर

पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.



हेही वाचा

हॉटेलमधील जेवण महागणार, व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 'इतकी' वाढ

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा