Advertisement

वसई विरार शहरात दुभाजकांवर शोभेच्या वृक्षांची लागवड

वसई-विरार शहरात विविध कारणांमुळे प्रदूषण वाढले आहे. हे प्रदूषण नियंत्रित करण्याबरोबरच त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेकडून विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत.

वसई विरार शहरात दुभाजकांवर शोभेच्या वृक्षांची लागवड
SHARES

वसई-विरार (virar) शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाकडून वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकांवर आणि चौकातील सर्कलमध्ये विविध शोभिवंत झाडे लावण्यात येणार आहेत. यासाठी विविध प्रकारच्या 53 हजार 641 शोभिवंत झाडांची (ornamental trees) लागवड करण्यात येणार आहेत. यामुळे येत्या काही काळात शहरातील दुभाजक सौंदर्याने फुलणार आहेत.

वसई-विरार शहरात विविध कारणांमुळे प्रदूषण वाढले आहे. हे प्रदूषण (pollution) नियंत्रित करण्याबरोबरच त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेकडून विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत. 

याच उपक्रमाच्या अंतर्गत शहराला प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी तसेच हवेतील प्राणवायूचे म्हणजेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी पालिकेने यंदा शहराच्या रस्त्यांवर असणाऱ्या दुभाजक तसेच सर्कलवर शोभिवंत अशी झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. 

सद्यस्थितीत महापालिकेच्या (vvmc) वृक्ष प्राधिकरण विभागाने 53,641 झाडांचे नियोजन केले आहे. नव्याने तयार होणारे दुभाजक आणि आधीचे दुभाजक मोकळे आहेत. वृक्ष लागवडीमुळे रस्त्यावर ये जा करताना हिरवळ दिसून येणार आहे. 

तसेच यामुळे वसई-विरार शहराच्या सौंदर्यात देखील भर पडण्यास मोठी मदत होणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. 

यापूर्वी शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत 85 लाख रुपये इतका निधी खर्च करण्यात आला होता. यासाठी शहरातील 24 ठिकाणी असलेल्या दुभाजकांची निवड करून दुभाजकांच्या मध्ये विविध झाडांची लागवड करण्यात आली होती.



हेही वाचा

हिंदी मराठीची लाडकी बहीण आहे : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

वांद्रे टर्मिनसवरील अॅक्सेस कंट्रोल पार्किंग सिस्टीम पार्किंग बंद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा