Advertisement

भारतात 'या' तारखेपासून देणार बूस्टर डोस, पंतप्रधान नरेंद्र मोदीची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशाला संबोधित करताना बूस्टर डोस संदर्भात मोठी घोषणा केली.

भारतात 'या' तारखेपासून देणार बूस्टर डोस, पंतप्रधान नरेंद्र मोदीची घोषणा
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशाला संबोधित करताना बूस्टर डोस संदर्भात मोठी घोषणा केली. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोस सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मोदी यांनी केली आहे.

आरोग्य कर्मचारी अर्थात हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सना दोन लसीकरणांनंतर बूस्टर डोसही देण्याची सुरुवात करण्यात येणार असल्याचं मोदीनी सांगितलं. याची सुरुवात १० जानेवारी, २०२१ पासून होणार आहे. ६० वर्षांवरील सामान्य नागरिकांनाही डॉक्टरांच्या सल्ल्यानं बूस्टर डोस देण्याची सुरुवात करण्यात येणार आहे.

याशिवाय पंतप्रधानांनी कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटला घाबरू नका, सतर्क राहा असं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की नवीन संसर्गास घाबरू नका, परंतु प्रतिबंध आणि कोविड नियमांचे पालन करा. याशिवाय पंतप्रधानांनी आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि लसीकरणाबाबत माहिती दिली.

पंतप्रधान मोंदींनी सांगितलं, १ लाख ४० हजार आयसीयू बेड आहेत. सर्व काही एकत्र केले तर मुलांसाठी ९० हजार विशेष बेड आहेत. ३००० हून अधिक PSA ऑक्सिजन प्लांट कार्यरत आहेत. ४ लाख ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आले आहेत.

यासोबतच १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु करणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. हे लसीकरण नव्या वर्षात ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. यामुळे शाळांमध्ये अखेरच्या वर्षात तसंच कनिष्ट महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

दरम्यान, भारतानं लसीच्या १४१ कोटी डोसचे अवघड उद्दिष्ट पार केलं आहे. किमान ९०% प्रौढ लोकसंख्येला लसीचा एक डोस देण्यात आला आहे.Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा