Advertisement

पालिका रुग्णालयातच आढळला विषारी नाग


पालिका रुग्णालयातच आढळला विषारी नाग
SHARES

मुलुंड पश्चिमेकडील पालिकेच्या एम. टी. अग्रवाल रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे हे रुग्णालय नेहमीच चर्चेत असते. आता तर या रुग्णालयात उपचारांसाठी रुग्णांसोबत चक्क कोब्रासारखे विषारी नाग यायला लागले आहेत की काय? असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण रुग्णालयाच्या या परिसरातून पुन्हा एकदा एका विषारी कोब्राला पकडून सर्पमित्रांनी जीवनदान दिले आहे.

गुरुवारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रॉ या प्राणीमित्र संघटनेला रुग्णालयाच्या आवारात एक साप असल्याचे सांगितले. रॉ चे सागर पांधी, रितेश रायमन आणि जीमेश गोहिल यांनी रुग्णालय परिसरात असलेल्या कोब्राला पकडले.

या नागाला पकडल्यानंतर सगळ्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या आधीही याच रुग्णालयात अशा प्रकारे कोब्रा नाग आढळून आला होता. या रुग्णालयाची दुरवस्था झाल्यामुळे बाजूला असलेल्या गर्द झाडीतून हे साप सहज रुग्णालयात प्रवेश करत असल्याची माहिती सर्पमित्र सागर पांधी यांनी दिली आहे.


हेही वाचा - 

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आढळला दुर्लभ जातीचा साप


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा