खाकीतला सर्पमित्र

खाकीतला सर्पमित्र
खाकीतला सर्पमित्र
See all
मुंबई  -  

मुंबईतल्या वांद्रे रेक्लमेशन परिसरात, नागपंचमीच्या दिवशी, म्हणजे गुरुवारी हातात साप घेतलेली खाकी वर्दीतली एका व्यक्ती अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. ही व्यक्ती म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल मुरलीधर जाधव. जेमतेम तिशीचे मुरलीधर जाधव पोलीस खात्यात आणि सर्वसामान्यांमध्येही सर्पमित्र म्हणून ओळखले जातात. एरवी गुन्हेगारांना जेरबंद करणारे त्यांचे हात अजगर, घोणस आदींना पकडताना ज्या चलाखीने चालतात, ते पाहूून थक्क व्हायला होते. पोलीस म्हणून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणाऱ्या मुरलीधर जाधव यांनी नागपंचमीच्या दिवशी मुंबईमध्ये वांद्रे रेक्लेमेशन येथे साप पकडून त्याला वन खात्याच्या स्वाधीन केले.मुरलीधर जाधव असे बनले सर्पमित्र

मुरलीधर जाधव आठ वर्षांचे असताना त्यांना जळगाव जिल्ह्यातील लोहारा गावात एका विषारी सापाने दंश केला. यावेळी त्यांचा जीव वाचवण्यासाठी परमेश्वराच्या रुपाने धावून आलेल्या सर्प मित्र राजेश ठोंबरे आले. त्यानंतर त्यांच रोज येणं जाणं त्यांच्या घरी होऊ लागलं. मुरलीधर यांनी ठोंबरे यांना गुरू मानले आणि ज्या सापांची भीती त्यांना वाटायची ते पकडण्याचे त्यांनी प्रशिक्षण  घेतले. 


आतापर्यंत पकडलेले साप

  • वयाच्या 10 व्या वर्षी पकडला पहिला साप
  • आतापर्यंत पकडले 3000हून अधिक विषारी आणि बिनविषारी जातींचे साप
  • महिन्याला पकडतात सुमारे 25 साप (विविध जातींचे)
  • वर्षाला सुमारे 350 ते 400 साप


आतापर्यंत पकडलेले सर्प

विषारी आणि बिनविषारी - नाग, मण्यार, अजगर, घोणस, फुरसे


मातोश्रीवर आलेला अजगर पकडणारेसुद्धा हेच

जून 2014साली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाच्या गेटवर अजगर आल्याची माहिती मुरलीधर जाधव यांना मिळाली. त्यानंतर त्वरीत ते तिथे गेले आणि काही मिनिटांतच अजगर पकडून त्याला वन खात्याच्या स्वाधीन केले. त्यांच्या या कौशल्याचे कौतुक उद्धव ठाकरे यांनीदेखील केले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेरच नाही, तर अभिनेत्री शिल्पा शिरोडकर, राजेश्वरी सचदेव यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या घरीदेखील त्यांनी साप पकडले. विशेष म्हणजे मुंबईमध्ये साप पकडण्यासाठी त्यांना दत्ता बोंबे हे मदत करतात.


स्वखर्चाने घेतले साप पकडण्याचे साहित्य -

मुरलीधर जाधव हे बघताक्षणी साप विषारी आहे की बिनविषारी? तो कोणत्या जातीचा आहे हे सांगू शकतात. विशेष म्हणजे साप पकडण्यासाठी ते कुणाकडूनही पैसे घेत नाहीत. साप पकडण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने 5000 रुपयांची सामग्री घेतली आहे.


घरात जर साप दिसला तर लोक त्याला घाबरून मारण्याचा प्रयत्न करतात. मात्र तोच साप जेव्हा मंदिरात असतो तेव्हा त्याची पूजा केली जाते. साप हा देखील सृष्टीचा एक भाग आहे. त्यामुळे ते वाचले पाहिजेत. जर तुमच्या घरात साप आला आणि तो तुम्हाला दिसला तर त्याला मारू नका 8108369944 या नंबरवर फोन करा.

- मुरलीधर जाधव, पोलिस कॉन्स्टेबल, शिवाजी पार्क पोलिस स्टेशन


हेही वाचा -

मुंबईच्या सर्पमैत्रिणीची कहाणी..

कोब्राला पकडणे बेतले जीवावरडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.