इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आढळला दुर्लभ जातीचा साप

  Mulund
  इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आढळला दुर्लभ जातीचा साप
  मुंबई  -  

  अतिदुर्मिळ समजल्या जाणाऱ्या मांजऱ्या (फोस्टन कॅट) हा साप सोमवारी मुलुंड पश्चिम येथील निर्मला अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर आढळला. एका शू रॅकमध्ये हा साप दडून बसला होता. अचानक साप पाहिल्यानंतर तिथल्या स्थानिकांमध्ये गोंधळ उडाला होता. पण त्यांनी सर्प मित्र तन्मय कोलते यांना पाचारण करून अखेर त्या सापाला पकडले. हा साप दीड ते दोन मीटर लांबीचा असून फॉर्स्टन कॅट या प्रजातीचा होता.

  हा साप कमी विषारी असून दिवसा झाडांच्या ढोलीत किंवा फांद्यांवर विसावतो. तो शिकारीसाठी मात्र रात्री बाहेर पडतो. बेडूक, मोठे कीटक, पक्षी तसेच पक्षांची अंडी आणि इतर लहान साप इत्यादींचे भक्षण करणारा हा साप शेजारीच असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून आला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. वन खात्याच्या परवानगीनंतर पुन्हा या महाशयांना याच उद्यानात सोडण्यात आले आहे.


  हा साप मुंबई सारख्या शहरात दुर्मिळ असून तो अन्नाच्या शोधात आला असावा.
  - सुनीश कुंजू, अधिकारी, वन खाते


  हेही वाचा -

  खाकीतला सर्पमित्र

  शाळकरी मुलीच्या सतर्कतेमुळे वाचले सापाचे प्राण


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.