Advertisement

महापालिकेसह आता पोलिसांकडून मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई

मास्कचा वापर न करणाऱ्या सगळ्यांवर ही कारवाई होणार आहे.

महापालिकेसह आता पोलिसांकडून मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई
SHARES

कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर राज्य सरकार व महापालिकेनं मास्कचा (mask) वापर करणं बंधनकारक केलं आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिका सतत याबाबत जनजागृती देखील करत आहे. मात्र तरीही अनेकजण मास्क न लावताच फिरत आहेत. त्यामुळं, नियमानुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. अशातच आता सार्वजनिक ठिकाणी (public place) मास्क न लावता फिरणाऱ्यांना आता महापालिकेच्या (bmc) कारवाईबरोबरच पोलीस कारवाईलाही सामोरे जावे लागणार आहे.

मास्कचा वापर न करणाऱ्या सगळ्यांवर ही कारवाई होणार आहे. त्याकरिता पोलिस (police) व वाहतूक पोलिसांचीही (traffic police) मदत घेण्यात येणार असून कायदेशीर कारवाईही केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता फिरणाऱ्यांविरोधात महापालिकेनं कडक कारवाई केल्यानंतरही अनेक जण नियमांचं पालन करीत नाही. मास्क लावल्या तरी त्या हनुवटीवर ओढून ठेवलेल्या असतात.

कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी मास्क लावणं हा प्रतिबंधात्मक उपाय असल्यामुळं महापालिकेनं आता आणखी कठोर भूमिका घेण्याचं ठरवलं आहे. मास्क न लावताच फिरणाऱ्यांकडून आधीच २०० रुपये दंड वसूल केला जात आहे. ४० हजारपेक्षा अधिक नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, यापोटी रुपये १ कोटी ५ लाखांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. ही दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पालिका अधिकाऱ्यांना दृक्श्राव्य माध्यमातून याबाबत निर्देश दिले.

मुंबई पोलीस दल, वाहतूक पोलीस यांची मदत घेण्याचे निर्देश महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांना दिले आहेत. सध्या महापालिकेच्या २४ विभागांमध्ये दंडात्मक कारवाई करण्यासाठी संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थांचे प्रतिनिधी व महापालिका कर्मचारी यांच्याद्वारे नियमितपणे कारवाई सुरु आहे. मास्क न लावणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याकरीता पोलिसांची तसेच नगरसेवकांची मदत घ्यावी व ‘संयुक्त कारवाई आराखडा’ तयार करण्याचे व त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.



हेही वाचा -

NDRF आणि NSSचं कोरोनाव्हारस विरोधात जनजागृती अभियान

MPSC ची नोव्हेंबरमधील परीक्षाही पुढे ढकलली


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा