Advertisement

नियम मोडणारे दहीहंडी मंडळ, आयोजकांविरोधात ४६ गुन्हे

सर्वोच्च न्यायालयाने नियम पाळण्याचे आदेश देऊनही दहीहंडी उत्सावादरम्यान लहान-मोठी मंडळे आणि आयोजकांकडून या नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं दिसून आलं होतं. त्यानुसार पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या मंडळ आणि दहीहंडी उत्सव कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या आयोजकांची यादी बनवली. यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.

नियम मोडणारे दहीहंडी मंडळ, आयोजकांविरोधात ४६ गुन्हे
SHARES

दहीहंडी उत्सवादरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलून सुरक्षा नियमांना हरताळ फासणारे मंडळ आणि आयोजकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला होता. त्यानुसार आवाजाच्या मर्यादेचा भंग करणं, मानवी थराची वयोमर्यादा न पाळणं, वाहतूक नियमांचं उल्लंघन करणं इ. कारणांवरून शहरातील विविध मंडळे आणि आयोजकांविरोधात ४६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने नियम पाळण्याचे आदेश देऊनही दहीहंडी उत्सावादरम्यान लहान-मोठी मंडळे आणि आयोजकांकडून या नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं दिसून आलं होतं. त्यानुसार पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या मंडळ आणि दहीहंडी उत्सव कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या आयोजकांची यादी बनवली. यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.

काय होते न्यायालयाचे आदेश?

दहीहंडीच्या उंचीवर मर्यादा नसली, तरी १४ वर्षांखालील मुलांना थरांमध्ये सामील करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली होती; तसंच गोविंदांचा विमा काढणे, सुरक्षा नियम पाळण्याचेही निर्देश दिले होते. जे मंडळं आणि आयोजक हे नियम पाळणार नाहीत, अशांवर कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले होते.

नियमांचं उल्लंघन

दहीहंडी उत्सवादरम्यान अनेक मंडळांनी त्यांच्या मानवी थरांमध्ये १४ वर्षांखालील मुलांचा समावेश केला होता. सुरक्षा उपाययोजनेशिवाय १४ वर्षांखालील मुलांना शेवटच्या थरावर चढवण्यात आल्याचंही यावेळी दिसून आलं. अशा मंडळांना थर लावण्यास आयोजकांकडूनही प्रोत्साहन दिलं जातं होतं.

दहीहंडी उत्सवादरम्यान एकूण २१९ जण जखमी झाले असून मंगळवारी सायंकाळपर्यंत नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ४६ गुन्हे नोंदवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा-

विमा नसल्यास दहीहंडी पथकांना रचता येणार नाहीत थर!

गणेशोत्सवासाठी गिरगाव चौपाटीवर परदेशी पर्यटकांसाठी विशेष व्यवस्था

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा