Advertisement

गणेशोत्सवासाठी गिरगाव चौपाटीवर परदेशी पर्यटकांसाठी विशेष व्यवस्था

दरवर्षी अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर मुंबईतील अनेक गणेशभक्त आणि गणेशमंडळांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे परदेशातून आलेल्या पर्यटकांना गणपती विसर्जनाचा आनंद घेता येत नाही. परदेशातून आलेल्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी एमटीडीसी आणि महापालिकेतर्फे पावलं उचलली अाहेत.

गणेशोत्सवासाठी गिरगाव चौपाटीवर परदेशी पर्यटकांसाठी विशेष व्यवस्था
SHARES

गणपती विसर्जनादिवशी परदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी गिरगाव चौपाटीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि मुंबई महानगरपालिकेतर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या गणेशोत्सवात परदेशी पर्यटकाना सहभागी होता यावे, यासाठी गिरगाव चौपाटीवर ३०० हून अधिक व्यक्तींना उभं राहता येईल अशी बाल्कनी उभारण्यात येणार अाहे.

बससेवा आणि अल्पोपहार 

दरवर्षी अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर मुंबईतील अनेक गणेशभक्त आणि गणेशमंडळांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे परदेशातून आलेल्या पर्यटकांना गणपती विसर्जनाचा आनंद घेता येत नाही. परदेशातून आलेल्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी एमटीडीसी आणि महापालिकेतर्फे पावलं उचलली अाहेत. या परदेशी पर्यटकांना ऑनलाइन नोंदणी सुविधा, शुद्ध पेयजल, मोबाइल स्वच्छतागृहे, बससेवा आणि अल्पोपहार अादी सुविधा पुरविण्यात येणार आहे. जगाच्या नकाशावर गणेशोत्सवाला स्थान मिळवून देण्याच्या उद्देशानं एमटीडीसीतर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. 


ऑनलाईन नोंदणी 

गेल्या वर्षी विसर्जनाच्या दिवशी विविध देशातल्या १४० पर्यटकांनी हजेरी लावली होती. यंदा विसर्जनात सहभाग होण्यासाठी परदेशी पर्यटकांना एमटीडीसीच्या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. ही नोंदणी मोफत असणार आहे. तसंच ज्या हॉटेलमध्ये पर्यटक राहणार आहेत त्या हॉटेलमधून आणण्याची आणि नेण्याची जबाबदारी एमटीडीसी घेणार अाहे. 



महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. तसंच, गणपती बाप्पाचं दर्शन परदेशी पर्यटकांना घेता यावं यासाठी गिरगाव चौपाटीवर  बाल्कनी उभारण्यात येणार आहे. या बाल्कनीत उभं राहून पर्यटकांना गिरगाव चौपाटीवर येणाऱ्या गणपती बाप्पांचं विसर्जन पाहता येईल.
- जयकुमार रावल, पर्यटन मंत्री



हेही वाचा-

१४ गणपती विशेष गाड्यांचा विस्तार; कोकण रेल्वेचा निर्णय

न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या दहीहंडी मंडळांवर कारवाई?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा