Advertisement

वसई विरारमधल्या दोन जीमवर पोलिसांची कारवाई

अरनाला पोलिस स्टेशनच्या पथकानं लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

वसई विरारमधल्या दोन जीमवर पोलिसांची कारवाई
SHARES

काही जिम (GYM) सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करत नसल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर अरनाला पोलिस स्टेशनच्या पथकानं लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. विरारमधील दोन जिम बंद करण्यात आली आहेत.

एलिट फिटनेस क्लब आणि वन रेप मॅक्स फिटनेस क्लब अशी या जिम्सची नावं आहेत. हे दोन जिम मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन करत असल्याचं आढळलं. त्यामुळे जिम बंद करत मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा आदेश वसई विरार (MBVV) आयुक्त, सदानंद दाते यांनी दिला आहे.

स्वतंत्रपणे, माणिकपूर इथून पोलिसांच्या पथकानं वसईतील सेरेजो ११ फिटनेस गाठलं. त्यानंतर प्रतिष्ठानच्या मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. “आम्ही जिमच्या मालकांवर आयपीसीच्या कलम १८८ (लोक सेवकाची आज्ञाधारक आज्ञा न पाळणे)” अंतर्गत कारवाई केली आणि सरकार त्यांना काम करण्यास परवानगी देत नाही तोपर्यंत त्यांचे जिम बंद ठेवण्यास सांगितलं आहे.”

वसई जिमचे मालक रोमन सेरेजो म्हणाले की, पोलिसांनी आम्हाला इशारा दिला आहे आणि गुन्हा दाखल केला आहे. जिममध्ये काम करणाऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा हवाला देत त्यांनी जिम सुरू केली. दरम्यान, राज्य आरोग्य मंत्रालय राज्यात जिम पुन्हा सुरू करण्यासाठी नेमकी वेळ अद्याप निश्चित करू शकलेला नाही.

महाराष्ट्रात जिम पुन्हा सुरू करण्यासाठी आमची चर्चा सुरू आहे. त्यांची व्यथा आम्ही समजू शकतो. परंतु कोरोनाचा धोका जास्त आहे. त्यामुळे आम्ही त्यांना फिटनेस सेंटर पुन्हा सुरू करण्यास परवानगी देऊ शकत नाही. जिम कार्यरत असल्याचं आढळल्यास त्यांच्यावर कायद्याच्या कक्षेत राहून कारवाई केली जाईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.



हेही वाचा

दक्षिण मुंबईतल्या उच्चभ्रू इमारतींमध्ये फोफावतोय कोरोना

बेस्ट समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही शिवसेनेची बाजी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा