Advertisement

फेरीवाले बाजूलाच, ग्राहकांवरच कारवाई? पोलिसांचा अजब न्याय!


फेरीवाले बाजूलाच, ग्राहकांवरच कारवाई? पोलिसांचा अजब न्याय!
SHARES

मुंबईतील रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर परिसरात कोणत्याही फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास बंदी आहे. मात्र, दादर रेल्वे स्थानकासमोरच रात्री नऊनंतर चक्क खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लावल्या जात आहे. मात्र, या हातगाड्या लावल्या गेल्यानंतरही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई महापालिकेचे अधिकारी आणि पोलिस अधिकारी करत नसून, उलट या हातगाड्यांवर खाद्यपदार्थ खाणाऱ्यांनाच पकडले जात आहे.


रात्री ९ नंतर...

दादर रेल्वे स्थानकाच्या समोरच रात्रीचे साडेनऊ वाजले की खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लागायला सुरुवात होते. तसेच, सुविधाच्या दिशेने बाहेर पडण्याच्या जागेवर केशवसूत उड्डाणपूलाखाली वडापाव विक्रेता स्टोव्ह पेटवून वडा, समोसा तळत असतो. तर त्यापुढील रेल्वेच्या प्रवेशद्वाराशेजारीच दरबार हॉटेलच्या समोर केशवसूत उड्डाणपुलाजवळही वडे व समोसा तळून त्याची विक्री केली जाते. याशिवाय येथून पुढे भेजाफ्राय तसेच तवा पुलाव आदी खाद्यपदार्थ विक्रीची हातगाडी लावली जाते.

हा सगळा प्रकार सुरु असताना पोलिस मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असून महापालिकेने नेमलेले खासगी सुरक्षा रक्षकही केवळ 'पंगा नको' म्हणून त्यांना हटकण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही.

चार दिवसांपूर्वी या हातगाड्यांवर जेवण आणायला गेलेल्या एका मुलालाच पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला दंड मारण्याचा प्रयत्न केला. त्याची आई जेव्हा चौकशीसाठी तिथे गेली, तेव्हा पोलिसांनी खाद्यपदार्थ घेत असल्यामुळे दंड भरण्यास सांगितले. स्थानिक महिला असल्यामुळे जुजबी चौकशी आणि ताकीदीनंतर मुलाला सोडून देण्यात आले.

असे प्रकार दादरमध्ये सर्रास सुरु आहेत. शिवाय, खाणाऱ्यांना पकडून एकप्रकारे फेरीवाल्यांवर कारवाई केल्याचे पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी दाखवत असल्याची कुजबुज तेथील फेरीवाल्यांकडून ऐकायला मिळत आहे.हेही वाचा

फेरीवाल्यांनी दिवसाढवळ्या कापले फुटपाथवरील रेलिंग!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा