कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. परिणामी या लॉकडाऊनमुळं रक्तदान शिबिरं होत नसल्यानं मुंबईतील रुग्णालयांमध्ये ८ ते १० दिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा सध्या उपलब्ध आहे.
मुंबईत लॉकडाऊन लागू असल्यानं अपघात, शस्त्रक्रिया यांचं प्रमाण कमी झालं असलं तरी थॅलेसेमियासारख्या आजारांच्या रुग्णांना नियमित रक्ताची गरज भासते. शहरात शासकीय आणि खासगी एकत्रित ५१ रक्तपेढ्या आहेत. सध्या शिबिरं होत नसल्यानं रक्ताचा साठा मर्यादित आहे. मुंबईतील रक्तपेढ्यांमधील १२ मेच्या आकडेवारीनुसार जे.जे रुग्णालयात १० युनिट तर राजावाडीमध्ये ५ युनिट रक्त शिल्लक आहे. एप्रिल महिन्यात रक्तदानासाठी आवाहन केल्यानंतर अनेक संस्थांनी सकारात्मकपणे पुढे येऊन शिबिरे आयोजित केली. नागरिकांनीही याला प्रतिसाद देत रक्तदान केल्याने मोठ्या प्रमाणात साठा निर्माण झाला होता.
रक्तसाठ्याची स्थिती
हेही वाचा -
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटण्याची शक्यता
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं ३० जूनपर्यंत रेल्वेगाड्या रद्द