Advertisement

मुंबईच्या 'तुंबई'वर पालिकेचा उपाय! पंपिंग स्टेशन्सवर अधिक क्षमतेच्या बॅकरेक स्क्रिन!

कचरा, तसेच इतर अवजड वस्तू अडकून पाण्याचा प्रवाह बंद होतो. परिणामी पंपिंग स्टेशन बंद पडून आसपासच्या भागात पाणी साचण्याचे प्रकार घडत आहेत. यावर उपाय म्हणून आता बॅकरेक स्क्रिन बसवले जाणार आहे. या स्क्रिनमधून गाद्यांसह लाकडी सामानाचा कचरा अगदी सहजतेने उचलून बाहेर फेकला जाणार आहे.

मुंबईच्या 'तुंबई'वर पालिकेचा उपाय! पंपिंग स्टेशन्सवर अधिक क्षमतेच्या बॅकरेक स्क्रिन!
SHARES

मुंबईमध्ये पावसात साचणाऱ्या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यासाठी महापालिकेकडून उदंचन केंद्र (पंपिंग स्टेशन)ची उभारणी करण्यात आली आहे. परंतु, या पंपिंग स्टेशनमधून बसवण्यात आलेल्या स्क्रिनमध्ये कचरा, तसेच इतर अवजड वस्तू अडकून पाण्याचा प्रवाह बंद होतो. परिणामी पंपिंग स्टेशन बंद पडून आसपासच्या भागात पाणी साचण्याचे प्रकार घडत आहेत. यावर उपाय म्हणून आता बॅकरेक स्क्रिन बसवले जाणार आहे. या स्क्रिनमधून गाद्यांसह लाकडी सामानाचा कचरा अगदी सहजतेने उचलून बाहेर फेकला जाणार आहे.


ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत ५ पंपिंग स्टेशन्स

मुंबईत पावसाळ्यातील पूरस्थितीला आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत हाजीअली, इर्ला, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलँड आणि ब्रिटानिया आऊटफॉल आदी पाच पंपिंग स्टेशनची उभारणी करून ते कार्यान्वित करण्यात आले आहेत. तर याशिवाय खारमधील गजधरबंद पंपिंग स्टेशनचे काम सुरु आहे. हाजीअली, क्लिव्हलँड आणि ब्रिटानिया आऊटफॉल आदी पंपिंग स्टेशनमध्ये बंदिस्त नाल्यांमधून पावसाचे पाणी वाहून येत असते. त्या तुलनेत इर्ला आणि लव्हग्रोव्ह या पंपिंग स्टेशनमध्ये उघड्या नाल्यांमधून पावसाचे पाणी येते. त्यामुळे हा कचरा समुद्रात पाण्यापासून रोखण्यासाठी या पंपिंग स्टेशनमध्ये स्क्रिन बसवण्यात आल्या आहेत.


पाण्यासोबतच वाहून येतो कचरा

पावसाच्या पाण्याच्या या प्रवाहातून येणारा तरंगता कचरा, तसेच पाण्यातून वाहून येणारा जड वजनाचा कचरा जसे की गाद्या, तुटलेल्या फर्निचरची लाकडे आदी या स्क्रिनमध्ये अडकून बऱ्याचदा पंपिंग स्टेशन बंद पडते. या सर्व अवजड वस्तूंचा कचरा हा विशेषत: उघड्या नाल्यांमधूनच येत असतो. त्यामुळे बऱ्याचदा इर्ला तसेच लव्हग्रोव्ह पंपिंग स्टेशनला अशा प्रकारचा कचरा अडकून ते बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर उपाय म्हणून अधिक क्षमतेचे बॅकरेक स्क्रिन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


विलेपार्ले भागात तुंबले होते पाणी

मागील पावसाळ्यात पाण्याची पातळी समुद्र सपाटीपासून कमी होऊन विलेपार्ला भागातील पाण्याचा निचरा होऊ शकला नव्हता. ही समस्या केवळ गाद्यांसह लाकडी सामान या स्क्रिनमध्ये अडकून पंपिंग स्टेशन बंद पडल्यामुळे घडली होती. त्यामुळेच अधिक क्षमतेच्या बॅकरेक स्क्रिन बसवण्याचे काम हाती घेण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा