Advertisement

'त्या' गर्भवतीला जायचं होतं दुबईला, पण इमारत दुर्घटनेत मृत्यू


'त्या' गर्भवतीला जायचं होतं दुबईला, पण इमारत दुर्घटनेत मृत्यू
SHARES

मुंबईतील जे. जे रोडवर झालेल्या इमारत दुर्घटनेत एका 35 वर्षाच्या गर्भवती महिलेचा देखील मृत्यू झाला आहे. सकीना चष्मावाला असे या महिलेचे नाव आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला आहे.

या घटनेत सकीनाचा नवरा अब्बास नजमुद्दीन चष्मावाला आणि 3 वर्षांच्या अमतुल्ला या दोघांचाही मृत्यू झाला आहे. पण यामध्ये सकीना आणि अब्बास यांची 9 वर्षांची मुलगी झेनब आणि अब्बास यांच्या 63 वर्षांच्या आई तसलील चष्मावाला या वाचल्या आहेत.


सकीना चष्मावाला या शुक्रवारी आपल्या काही नातेवाईकांना भेटण्यासाठी दुबईला जाणार होत्या. पण, त्या जिथे राहात होत्या ती इमारत अचानक कोसळली. या दुर्दैवी घटनेत तिने आपला जीव गमावला, अशी प्रतिक्रीया तिचे नातेवाईक इस्माईल भारमल यांनी दिली.


सकीना यांच्या डोक्याला चांगलाच मार बसला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले पण त्या वाचू शकल्या नाहीत, अशी प्रतिक्रिया तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.

मी सकाळी दर्ग्यात जात होतो. पण, मला कळलं की अशी घटना घडली आहे. सकीना ही माझ्या मुलीची नणंद होती. त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. तिच्या नवऱ्याचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तिच्या सासूला डोक्याला मार लागल्याकारणाने तिच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.

- इस्माइल भारमल, सकीनाचे नातेवाईक


हेही वाचा - 

३ हजार धोकादायक इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढणार?

भेंडीबाजार इमारत दुर्घटना : मृतदेह मिळवण्यासाठी नातेवाईकांची धडपड


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा