Advertisement

मुंबईत पेट्रोल ८८.२९ रुपयांवर


मुंबईत पेट्रोल ८८.२९ रुपयांवर
SHARES

केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवर दिलेल्या सवलतीनंतरही इंधनाचे दर सातत्याने वाढतच राहिले आहेत. मंगळवारी पेट्रोल ११ पैशांनी, तर डिझेल २४ पैशांनी महागलं आहे. त्यानुसार मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ८८.२९ रुपये आणि डिझेल प्रति लिटर ७९.३५ रुपयांवर पोहोचलं आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची कमतरता जाणवत असल्याने तेलाच्या किंमतीत प्रती बॅरलने वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या मागणीतही सातत्याने वाढ होत असून तेलाच्या किंमतीवरील तणाव कायम असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

बेंट क्रूड आॅईल आयसीईवर १.१३ टक्के वाढीसह ८१.३४ डाॅलर प्रति डाॅलरवर पोहोचलं होतं. सोमवारी ८१.७९ किंमतीवर सुरूवात झालेल्या बेंट क्रूड आॅईलची किंमत दिवसअखेर ८१.८६ डाॅलर प्रति बॅरलवर पोहोचली.



हेही वाचा-

मुंबईत राहतात सर्वाधिक श्रीमंत लोक; दिल्ली दुसऱ्या स्थानावर

डिजिटल पेमेंटचे ५ फायदे ! नक्की वाचा...



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा