पेपर दरवाढ विरोधात प्रिंटर्स मालक एकवटले

 Nariman Point
पेपर दरवाढ विरोधात प्रिंटर्स मालक एकवटले
Nariman Point, Mumbai  -  

देशातील सर्वात जुना व्यवसाय असलेल्या प्रिंटिंग आणि पॅकेजिंग उद्योगावर कागदाच्या दरवाढीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे हा उदयोग धोक्यात आला असून, आपलं अस्तित्व आणि उद्योग टिकवण्यासाठी देशातील अडीच लाख प्रिंटर्स व्यावसायिक एकवटले आहेत.

गेल्या 2 महिन्यांपासून या उद्योगातील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या कागदाच्या किंमतीत 30 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. वाढत्या दरवाढीमुळे आम्ही आमच्या किंमतीत 15 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला आमच्या ग्राहकांनी पाठिंबा द्यावा व हा उद्योग बंद होण्यापासून वाचवावा, असे बॉम्बे मास्टर्स प्रिंटर्स असोसिएशनचे अध्यक्ष मेहुल देसाई यांनी म्हटले. प्रिंटिंग आणि पॅकेजिंग व्यवसायाला भेडसावणाऱ्या समस्या, दरवाढ याबाबत आपली बाजू मांडण्यासाठी नॅशनल आणि लोकल असोसिएशन ऑफ प्रिंटर्सनी गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

'यूएसए, चीन आणि युरोपमधील जागतिक पेपर मिलमधल्या पेपर मशिनरी टेक्नॉलॉजी मध्ये वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाडेवाढ, पल्पच्या किंमतीत वाढ, ओव्हरहेड कॉस्ट आणि मजुरांच्या किंमतीत वाढ झाली आहे 

तुषार धोटे, मुंबई मुद्रक संघाचे अध्यक्ष

सुमारे अडीच लाख प्रिंटर्स आणि त्यावर अवलंबून असलेले साडेचार लाख लोक आणि त्यांचं कुटुंब यांच्यासाठी प्रिंटिंग क्षेत्रात 15 टक्के दरवाढ करणे गरजेचे आहे. हा व्यवसाय अजून वाढवण्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. या क्षेत्रातील कमी नफा आणि कमी ग्लॅमर यामुळे या क्षेत्राकडे तरुण वर्ग फारसा वळत नाही. त्यामुळे पंतप्रधान कुशल योजने अंतर्गत बंगळुरू येथे अद्ययावत तंत्रप्रणालीयुक्त प्रिंटिंग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे योजिले आहे. हा उद्योग वाचवण्यासाठी आमचे ग्राहक असलेल्या बँका, फार्मा कंपन्या, एजीएफसी, वर्तमानपत्र, प्रकाशन हाऊस यांनी आमच्या वाढीव किंमतीला पाठिंबा द्यावा. वेळ पडल्यास हा उद्योग वाचवण्यासाठी आम्हाला संपही पुकारावा लागेल अशी प्रतिक्रिया मुंबई मुद्रक संघाचे अध्यक्ष तुषार धोटे यांनी दिली.

Loading Comments