• राणीबागेतील अजगरावर अंधश्रद्धेतून 'नाणीफेक'
  • राणीबागेतील अजगरावर अंधश्रद्धेतून 'नाणीफेक'
SHARE

श्रद्धा आणि अंधश्रद्धा या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हटल्या पाहिजेत. खऱ्या श्रद्धेतून एखाद्या व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा, प्रेरणा मिळते, तर हीच श्रद्धा अंधश्रद्धेत रुपांतरीत झाल्यास तिचा संबंधित व्यक्तीसोबतच इतरांनाही त्रास होऊ शकतो. सध्या असाच काहीसा प्रकार भायखळ्यातील जीजामाता उद्यानात (राणीबाग) घडत आहे. अंधश्रद्धेपोटी राणीबागेतील एका अजगराला नाणी फेकून मारण्याचा प्रकार मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.

राणी बागेत सध्या अंधश्रद्धेचे वारे वाहत असून त्याचा मोठा त्रास उद्यानातील अजगराला होत आहे. राणी बागेत येणारे पर्यटक अजगराला नाणी फेकून मारत आहेत. 'गुडलक'साठी पर्यटकांकडून अजगराला नाणी फेकून मारली जात असल्याचे येथील सुरक्षा रक्षकांनी सांगितले.

सुरक्षा रक्षकांनी या पर्यटकांना अडवण्याचा प्रयत्न करूनही काही पर्यटक सुरक्षा रक्षकांची नजर चुकून अजगराला नाणी फेकून मारत आहेत. मागील काही दिवसांपासून या प्रकारात वाढ झाली असून प्लान्ट अँड अॅनिमल वेल्फेअर सोसायटीचे सचिव सुनीश कुंजू यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.

या बाबत उद्यानाचे अधिक्षक संजय त्रिपाठी यांना विचारले असता त्यांनीही या प्रकाराला दुजोरा दिला. अजगराला त्रास होऊ नये म्हणून त्याच्या पिंजऱ्याकडील सुरक्षा वाढवल्याचेही त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या