Advertisement

गोवंडीजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बरवर सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांचे हाल

सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकलसेवा विस्कळीत झाली.

गोवंडीजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बरवर सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांचे हाल
SHARES

हार्बर मार्गावरील गोवंडी-चेंबूर स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे कार्यालयात जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागलाणार आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह चेंबूर आणि कुर्ला स्थानकांत हजारो प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे. 

हार्बर मार्गावरील ट्रेन चेंबूरहून पुढे जात नाही आहे. हार्बर मार्गावर गेल्या तीन दिवसांतील ही तिसरी समस्या आहे ज्यामुळे लोकल सेवा प्रभावित झाली आहे. 

सीआर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 7.50 वाजता घडली. मात्र, सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. दरम्यान, तासाभरानंतर हार्बर मार्गावरील डाऊन गाड्या काही काळ विस्कळीत झाल्यानंतर पुन्हा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी उशीर होऊ नये म्हणून रुळांवरून चालत जावं लागलं. 

रेल्वे रुळाच्या दुरुस्तीनंतर वाहतूक पुन्हा एकदा सुरु करण्यात आली, मात्र लोकल उशिराने सुरु असल्यामुळे प्रवाशांची अडचण झाली. ऑफिसला जाण्यासाठी लगबग सुरु असताना ऐन गर्दीच्या वेळी लोकल रखडल्याने प्रवाशांना आज पुन्हा मनस्ताप सहन करावा लागला.

दरम्यान, सीएसएमटी रेल्वे स्थानकावर हार्बर मार्गावरील लोकलचा डबा घसरल्याने मंगळवारी छोटा अपघात झाला होता. मंगळवारनंतर सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. गोवंडी स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेले होते. त्यामुळे सीएसएमटीकडून पनवेलच्या दिशेने जाणारी हार्बर रेल्वेसेवा काही काळासाठी बंद झाली होती.



हेही वाचा

मुंबईत मंकीपॉक्स अलर्ट, कस्तुरबा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड सज्ज

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा