Advertisement

हवेतील आद्रतेमुळं ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी पावसाची हजेरी

मागील २ दिवसांपासून असलेल्या दमट व थंड वातावरणामुळं नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

हवेतील आद्रतेमुळं ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी पावसाची हजेरी
SHARES

मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणपट्टीच्या काही भागांत गुरूवारी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. शिवाय, काही दिवस कडकडीत उन्हानं नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, मागील २ दिवसांपासून असलेल्या दमट व थंड वातावरणामुळं नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र आता पुढील काही दिवस मुंबईसह संपूर्ण कोकणात आकाश ढगाळ असेल. तसा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या काही भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाचीही शक्यता आहे. राज्यावर पुन्हा एकदा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ४ दिवस राज्याच्या सर्वच भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस कोसळेल, असा इशारा देण्यात आला आहे.

वायव्येकडून येणारे कोरडे वारे आणि हवेत वाढलेली आद्रता यांमुळं मुंबईसह किनारपट्टीच्या भागांत पावसानं हजेरी लावली. कुलाबा इथं गुरूवारी सकाळी ८७ टक्के तर सायंकाळी ८१ टक्के आद्रता नोंदविण्यात आली. तसंच, सांताक्रूझ इथं सकाळी ७६ तर सायंकाळी ६७ टक्के आद्रतेची नोंद झाली. कुलाबा आणि सांताक्रूझ इथं गुरूवारी ३२.६ अंश सेल्सिअस कमाल आणि अनुक्रमे २६ आणि २४.७ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. तापमान सर्वसाधारण असले तरीही वाढलेल्या आद्रतेमुळं गुरूवारी सकाळपासूनच उष्णता जाणवत होती. मात्र दिवसभर हवामान ढगाळ होते.

आद्रतेमुळं ढग निर्माण झाल्यानं मुंबई परिसरात काही प्रमाणात पावसाचा शिडकावा झाला. संध्याकाळी हवेत थंडावा जाणवत होता. पुढील ३-४ दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. सध्या पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लगतच्या भागापासून पूर्व विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तो राज्याच्या इतर ठिकाणीही सरकू शकतो. परिणामी पुढील ४ दिवस राज्यातील सर्वच विभागांत कमी-अधिक प्रमाणात अवकाळीची शक्यता आहे. कोकण विभागात १० एप्रिलपर्यंत तुरळक ठिकाणी हलका आणि त्यानंतर दोन दिवस काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.हेही वाचा -

जाणीवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबात चुकीच्या बातम्या का?

कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या व्यक्तींबाबत संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्यRead this story in English
संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा