Advertisement

Mumbai Rains update: मुंबईत आतापर्यंत ९९.६५ टक्के पावसाची नोंद

मुंबईत आतापर्यंत झालेला एकूण सरासरी पाऊस २ हजार ४८० मिमी असून, ही टक्केवारी ९९.६५ एवढी आहे.

Mumbai Rains update: मुंबईत आतापर्यंत ९९.६५ टक्के पावसाची नोंद
SHARES

मुंबईत ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून मुसळधार पावसानं तुफान बॅटींग करण्यास सुरूवात केली. त्यामुळं मुंबईत आतापर्यंत झालेला एकूण सरासरी पाऊस २ हजार ४८० मिमी असून, ही टक्केवारी ९९.६५ एवढी आहे. दरम्यान, सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे. मुंबईत गुरुवारी चक्क ऊनं पडलं असून, कुलाबा, सांताक्रूझ वेधशाळेत ०.० मिमी एवढी पावसाची नोंद झाली.

मुंबई शहरात देखील १, पूर्व उपनगरात ०.० आणि पश्चिम उपनगरात ०.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.  मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी पडझड सुरुच आहे. बुधवारी रात्री ऊशिरा साडे दहाच्या सुमारास मानखुर्द येथे सेक्टर जे मध्ये घराचे प्लास्टर कोसळले. यात ४ जण जखमी झाले. त्यांना खासगी ज्युपीटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी ३ जणांना किरकोळ मार लागल्यानं उपचार करून सोडून देण्यात आले.

एक मुलगा रुग्णालयात दाखल असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, ४ ठिकाणी बांधकाम कोसळले. ३ ठिकाणी झाडं पडली. ३ ठिकाणी शॉर्ट सर्किट घडले. राज्यात विचार करता ४ सप्टेंबर रोजी दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

५ आणि ६ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईचा विचार करता शुक्रवारसह शनिवारी शहर आणि उपनगरात रात्री आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.  



हेही वाचा -

अंतिम वर्षाच्या परीक्षा घरूनच, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा

सरकारला मंदिर उघडण्याबाबत इतका आकस का?- राज ठाकरे


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा