Advertisement

‘एक देश, एक राशन कार्ड’ योजना लवकरच होणार लागू

आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरल, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगाना आणि त्रिपुरा या राज्यांचा यात समावेश आहे.

‘एक देश, एक राशन कार्ड’ योजना लवकरच होणार लागू
SHARES

पुढच्या वर्षी १ जूनपासून ‘एक देश, एक राशन कार्ड’ योजना देशभरात लागू होईल, अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी दिली.

पासवान म्हणाले की, सध्या १४ राज्यांमध्ये राशन कार्डसाठी पीओएस मशीनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ती सुविधा लवकरच देशातील सर्व राज्यात सुरु केली जाईल. त्या लोकांना या योजनेचा फायदा होईल, जे कामानिमित्त इतर राज्यात राहतात. त्यांना कोणत्याही राज्यातील राशन दुकानावरुन आता राशन मिळेल.

अनेक राज्यात इंटीग्रेटिड मॅनेजमेंट ऑफ पीडीएस(आयएमपीडीएस) अंतर्गत खाद्य आणि सार्वजनिक वितरणाअंतर्गत लाभार्थी कोणत्याही जिल्ह्यातून राशन खरेदी करू शकतील. आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरल, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगाना आणि त्रिपुरा या राज्यांचा यात समावेश आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा