Advertisement

महापालिका रुग्णालयातलं हाऊसकिपिंग महागडं

मुंबईतील जुन्या आणि गर्दीच्या रुग्णालयांमध्ये साफसफाईसाठी कमी दर आकारण्यात येत असतानाच दुसरीकडे नव्याने बांधलेल्या रुग्णालयांमधील साफसफाईसाठी जास्त दर आकारण्यात येणार आहे. नवीन रुग्णालयांमध्ये प्रस्थापित कंपनी असून या कंपनीला फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केल्याचं दिसून येत आहे.

महापालिका रुग्णालयातलं हाऊसकिपिंग महागडं
SHARES

मुंबई महापालिकेच्या ३ प्रमुख रुग्णालयांसह ७ रुग्णालयांच्या स्वच्छतेची जबाबदारी लवकरच खासगी संस्थांवर टाकण्यात येणार आहे. त्यासाठी मागवण्यात आलेल्या निविदांमध्ये केईएम, शीव आणि नायर रुग्णालयांच्या तुलनेत कूपर, कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय (शताब्दी) आणि जोगेश्वरीच्या हिंदूहृयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रामा रुग्णालयातील साफसफाईच्या दरात कमालिची तफावत असल्याचं आढळून आलं आहे.


प्रस्थापित कंपनीसाठी खटाटोप?

मुंबईतील जुन्या आणि गर्दीच्या रुग्णालयांमध्ये साफसफाईसाठी कमी दर आकारण्यात येत असतानाच दुसरीकडे नव्याने बांधलेल्या रुग्णालयांमधील साफसफाईसाठी जास्त दर आकारण्यात येणार आहे. नवीन रुग्णालयांमध्ये प्रस्थापित कंपनी असून या कंपनीला फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केल्याचं दिसून येत आहे.


कुठल्या कंपन्यांचा समावेशी?

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये महापालिकेच्या कामगारांची संख्या कमी असल्याने खासगी कंपन्यांच्या मदतीने साफसफाई केली जाते. या हाऊसकिपिंग करीता महापालिकेने ३ वर्षांचं कंत्राट देण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.

या निविदांमध्ये केईएम, शीव, नायर आणि कूपर रुग्णालयांच्या साफसफाईचं कंत्राट केएचएफएम हॉस्पिलिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला, तर नायर दंत, कांदिवली डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयाचं कंत्राट सिगमा टेकइन्फ्रा सोल्यूशन इंडिया यांची कंत्राटदार निवड झाली आहे. या सर्व रुग्णालयांसाठी पुढील ३ वर्षांकरीता ५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.


किती दर आकारणी?

नायर धर्मादाय रुग्णालयासाठी प्रति चौरस फुटाच्या साफसफाईसाठी मासिक दर ६.२० रुपये असून त्यातुलनेत नायर दंत रुग्णालयासाठी याच कामासाठी हा दर ७.२५ रुपये एवढा आहे. नायर धर्मादाय रुग्णालयातील गर्दीच्या तुलनेत दंत रुग्णालयात कमी गर्दी आणि स्वच्छता चांगल्याप्रकारे असते. त्यामुळे याच दोन बाजूच्या बाजूच्या इमारतींमधील रुग्णालयांच्या साफसफाईसाठी लावलेला दर हा डोळे दिपवून टाकणारा आहे.

सिगमा या कंपनीच्यावतीने महापालिका मुख्यालय, वरळी हब, मुंबई आपत्कालीन विभाग आदींच्या हाऊस किपिंगचं काम करण्यात येत आहे. परंतु याच कंपनीने अधिक बोली लावून नवीन काम मिळवलं आहे. असून केईएम, शीव रुग्णालयाच्या बरोबरीने सर्व दर समान असावे यासाठी अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराशी वाटाघाटी न करताच या कंपनीची निवड केली आहे. त्यामुळे या कंपनीशी वाटाघाटी केल्यास हा दर कमी होईल आणि पर्यायाने महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचं होणारं नुकसान टाळता येणार आहे.


'असा' आहे चौरस फुटाचा दर

कंत्राटदार: केएचएफएम हॉस्पिलिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनी

  • केईएम रुग्णालय : ३.१४ रुपये
  • शीव रुग्णालय : ४.१३ रुपये
  • नायर धर्मादाय रुग्णालय : ६.२० रुपये
  • जुहू, कूपर रुग्णालय : ५.३० रुपये


कंत्राटदार: सिगमा टेकइन्फ्रा सोल्यूशन इंडिया

  • नायर दंत रुग्णालय : ७.२५ रुपये
  • कांदिवली बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय : ८.०८ रुपये
  • जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालय : ७.२७ रुपये



हेही वाचा-

सेंट जाॅर्ज रुग्णालयात कर्मचाऱ्यांना अग्निशमन प्रशिक्षण

जे. जे. रुग्णालयातील मोबाइल चोराला अटक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा